Bollywood : अरिजित सिंग यांनी गायलेले “बॅड बॉय” मधील ‘तेरा हुआ” गाणे रिलीज

बॅड बॉय (Bad Boy) या आगामी चित्रपटातील तेरा हुआ (Tera hua) हे पहिले गाणे रिलीज झाले आहे. अरिजित सिंग आणि ज्योतिका टांगरी यांनी गायलेलं या गाण्यामध्ये नमाशी चक्रवर्ती आणि अमरीन आहेत. नमाशी हा अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा आहे. हे गाणे रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील काही सुंदरठिकाणी चित्रित करण्यात आले आहे आणि रणबीर कपूर आणि […]

Tera Hua : Arijit singh

Tera Hua : Arijit singh

बॅड बॉय (Bad Boy) या आगामी चित्रपटातील तेरा हुआ (Tera hua) हे पहिले गाणे रिलीज झाले आहे. अरिजित सिंग आणि ज्योतिका टांगरी यांनी गायलेलं या गाण्यामध्ये नमाशी चक्रवर्ती आणि अमरीन आहेत. नमाशी हा अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा आहे.

हे गाणे रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील काही सुंदरठिकाणी चित्रित करण्यात आले आहे आणि रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या खुदा जाने या गाण्याप्रमाणेच ते गाणे आहे. तेरा हुआ प्रमुख जोडीची केमिस्ट्री दाखवते. हे गाणे हिमेश रेशमियाने संगीतबद्ध केले आहे. त्याचे शब्द सोनिया कपूर रेशमिया यांनी लिहिले आहेत.

नमाशी चक्रवर्ती आणि अमरीन यांच्याशिवाय या चित्रपटात जॉनी लीव्हर, शाश्वत चॅटर्जी, राजपाल यादव, राजेश शर्मा आणि दर्शन जरीवाला यांच्याही भूमिका आहेत. इनबॉक्स पिक्चर्सच्या बॅनरखाली अंजुम कुरेशी आणि साजिद कुरेशी निर्मित बॅड बॉयचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले आहे.

Exit mobile version