अगं आई अहो आई आगामी झी 5 मराठीवरील वेब शो बद्दल अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मांडल खास मत

अशा काळात अशी मालिका, जिथे आधीच कोणाविषयी पूर्वग्रह नाहीत, जिथे सासू आणि सून एकमेकांना खुलेपणाने स्वीकारतात, हे खूप महत्त्वाचं आहे.

Untitled Design (84)

Untitled Design (84)

Renuka Shahane shared a special opinion : आगामी झी5 मराठी वरील “अगं आई अहो आई” वेब शो च्या निमित्ताने अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी त्यांच खास मत मांडल असून त्यांनी आजच्या पिढीबद्दल विशेष मत मांडल आहे. त्या सांगतात “आजच्या काळात वेगवेगळ्या पिढ्यांनी एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे” अनेक वर्षांपासून लोकप्रिय माध्यमांमध्ये सासू-सुनेचं नातं मुख्यतः संघर्षातून दाखवलं गेलं आहे. हे ठरलेले समज मोडणाऱ्या कथा सांगणं किती महत्त्वाचं आहे, असं तुम्हाला वाटतं?

आपण चित्रपट आणि मालिकांमध्ये सासू-सुनेचं नातं बहुतेक वेळा संघर्ष, कारस्थाने आणि वादांनी भरलेलं पाहिलं आहे. अनेकदा “”बाई ही बाईची शत्रू असते”” हा समज अधिक बळकट केला जातो.मला वाटतं महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. आपल्या समाजात अनेक प्रगत विचारांच्या स्त्रिया होऊन गेल्या आहेत. त्यामुळे सतत नात्यांचं एकच नकारात्मक चित्र दाखवण्यापेक्षा वेगळं आणि सकारात्मक उदाहरण समाजासमोर येणं आवश्यक आहे.आजही आपण हुंडाबळी, सासरच्या छळाच्या घटना वाचतो. अशा काळात अशी मालिका, जिथे आधीच कोणाविषयी पूर्वग्रह नाहीत, जिथे सासू आणि सून एकमेकांना खुलेपणाने स्वीकारतात, हे खूप महत्त्वाचं आहे.

24 जुलैला CJP चा देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाचा एल्गार, देशभरातील आंदोलनकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न

विशेष म्हणजे छोट्या शहरांमध्ये किंवा गावांमध्येही पुरोगामी विचार असू शकतात, हे ही मालिका सुंदरपणे दाखवते.निर्मिती सावंत यांनी साकारलेल्या सासूच्या व्यक्तिरेखेचं तिच्या सुनेशी जुळणारं नातं आणि एकमेकांना समजून घेण्याचा त्यांचा प्रवास खूप सुंदर आहे. या मालिकेतून बाई ही बाईची वैरी नसून एकमेकींचा आधार असू शकते, हा सकारात्मक संदेश दिला आहे. ही मालिका वेगवेगळ्या पिढ्यांमधील सहानुभूती आणि एकमेकांना समजून घेण्याचं महत्त्व अतिशय सुंदरपणे दाखवते. आजच्या कौटुंबिक नात्यांमध्ये हे विषय किती महत्त्वाचे आहेत, असं तुम्हाला वाटतं?

मला वाटतं आजच्या काळात वेगवेगळ्या पिढ्यांनी एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या परंपरा आणि आधुनिक विचार यांचा समतोल राखत नाती अधिक समृद्ध करता येतात.अगं आई अहो आई’ मध्ये कल्याणी आणि वरुण यांनी हा समतोल अतिशय सुंदरपणे मांडला आहे. परंपरा जपतानाच बदल स्वीकारण्याचा दृष्टिकोन या मालिकेत दिसतो आणि तो आजच्या समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे. २४ जुलै पासून ही खास गोष्ट झी ५ मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Exit mobile version