Gautami Patil नाचत असतानाच तरुणांकडून…. पोलिसांच्या हस्तक्षेपाने मिटलं

Rioting by youth Gautami Patils programme : सध्या सर्वाधिक चर्चेत व लोकप्रिय असे एक नाव म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil ) होय. गौतमीचा डान्सचा कार्यक्रम म्हंटले की गोंधळ होणार हे समीकरण बनले आहे. असाच काहीसा प्रकार नुकताच तिच्या आणखी एका कार्यक्रमात पाहायला मिळाला आहे. यावेळी तिचा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यामध्ये होता. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या […]

Gautami Patil 460x375

Gautami Patil 460x375

Rioting by youth Gautami Patils programme : सध्या सर्वाधिक चर्चेत व लोकप्रिय असे एक नाव म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil ) होय. गौतमीचा डान्सचा कार्यक्रम म्हंटले की गोंधळ होणार हे समीकरण बनले आहे. असाच काहीसा प्रकार नुकताच तिच्या आणखी एका कार्यक्रमात पाहायला मिळाला आहे. यावेळी तिचा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यामध्ये होता.

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होते. तिला महाराष्ट्रभरातून कार्यक्रमाला बोलावलं जात आहे. गौतमीही आपल्या कार्यक्रमाचं नियोजन करत कार्यक्रमाला हजेरी लावत असते. तर या श्रीगोंद्याच्या कार्यक्रमात गौतमीची लावणी व ऑर्केस्ट्रा महोत्सवाच्या कार्यक्रमांत तरुणांनी हुल्लडबाजी केल्याने श्रीगोंदा पोलिसांनी लाठीचार्ज करत त्या तरुणांना कार्यक्रमस्थळावरून हाकलून दिले.

Pushpa 2 : रिलीज आधीच पुष्पा 2 ची बक्कळ कमाई, बाहुबली 2, आरआरआरचंही रेकॉर्ड तोडलं

या अगोदर देखील तिच्या काही कार्यक्रमात असे प्रकार झोले आहेत. अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच नृत्यांगना गौतमी पाटीलचा कपडे बदलत असताना व्हिडीओ काढून तो समाज माध्यमांवर व्हायरल केल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मुलगा अल्पवयीन असल्याने आई-वडील आणि मुलाला विमान नगर पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

त्यानंतर आता पुन्हा याच ठिकाणी कार्यक्रमात गौतमीची लावणी व ऑर्केस्ट्रा महोत्सवाच्या कार्यक्रमांत तरुणांनी हुल्लडबाजी केल्याने श्रीगोंदा पोलिसांनी लाठीचार्ज करत त्या तरुणांना कार्यक्रमस्थळावरून हाकलून दिले.

Exit mobile version