Download App

‘अंगावर शहारे आणणारा’ कांताराचा ‘अ लेजेंड चॅप्टर-1’ चा फर्स्ट लूक अन् धमाकेदार टीझर रिलीज

Kantara Chapter 1 Teaser Release: सप्टेंबर 2022 मध्ये ‘कांतारा’ (Kantara) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला होता. सिनेमाची कथा, सिनेमामधील अ‍ॅक्शन सीन्स आणि सिनेमामधील कलाकारांचा अभिनय या सर्वच गोष्टींचं चाहत्यांनी तोंडभरून कौतुक केलं. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका केला आहे. (Kantara Chapter 1 Teaser out) आता कांतारा सिनेमाच्या यशानंतर या सिनेमाच्या निर्मात्यांनी या सिनेमाच्या प्रीक्वलचे घोषणा केली आहे. या प्रीक्वेलचं नाव कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 (Kantara A Legend Chapter-1) असं आहे. या सिनेमात ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) फर्स्ट लूक आणि धमाकेदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.


कांतारा ‘अ लेजेंड चॅप्टर-1’ या सिनेमाचा फर्स्ट लूक ऋषभ शेट्टीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तो संपूर्ण रक्ताने माखलेला बघायला मिळत आहे. त्याच्या एका हातात त्रिशुळ दिसत आहे. तसेच कांतारा ‘अ लेजेंड चॅप्टर-1’ या सिनेमाच्या फर्स्ट लूकचा टीझर देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ऋषभ शेट्टीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 या टीझरच्या फर्स्ट लूकवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असल्याचे दिसत आहे. एका चाहत्याने कमेंट केली, “कन्नड सिनेमासृष्टीतून आणखी एक ब्लॉकबस्टर सिनेमा…..” तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली आहे की, आम्ही या सिनेमाची खूप उत्सुकतेने वाट बघत आहोत.

‘कांतारा’ हा सिनेमा अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा सिनेमा फक्त साऊथच नव्हे तर, हिंदीमध्ये देखील हिट ठरला. ‘कांतारा’ या सिनेमात अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत बघायला मिळाले आहेत. तर या सिनेमात ऋषभनं शिवा ही मुख्य भूमिका साकारली. या सिनेमातील ऋषभच्या अभिनयाचं सर्वत्र तोंडभरुन कौतुक केलं आहे. कन्नड भाषेतील कांतारा हा सिनेमा हिंदी आणि तेलुगू या भाषांमध्ये देखील प्रदर्शित झाला आहे. कांतारा हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील तुम्ही बघू शकणार आहात.

12th Fail: दमदार कमाईनंतर ’12 वी फेल’चा जलवा; ऑस्कर 2024 मध्ये स्वतंत्र प्रवेश

आता कांतारा ‘अ लेजेंड चॅप्टर-1’ या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. कांतारा ‘अ लेजेंड चॅप्टर-1’ हा सिनेमा कधी रिलीज होणार? तसेच या सिनेमात आणखी कोण- कोणते नवनवीन कलाकार काम करणार आहेत? हे जाणून घेण्यास चाहते खूपच उत्सुक झाल्याचे दिसत आहेत.

Tags

follow us