Download App

Kannad Movie : ऋषभ शेट्टींनी केली कांताराच्या प्रीक्वलची घोषणा, म्हणाले…

बंगळुरू : ऋषभ शेट्टींचा चित्रपट कांताराच्या सक्सेसनंतर आता मेकर्सने या चित्रपटाच्या प्रीक्वलची घोषणा केली आहे. नुकतचं हा चित्रपट रिलीज होऊन 100 दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्त ऋषभ शेट्टींनी चाहत्यांशी ही गुड न्यूज शेअर करत सांगितलं की, चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. तर ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने ही सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली.

तरण आदर्शने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘कांताराच्या प्रीक्वलची अनाउंसमेंट झाली आहे. आता पर्यंतचा हा सर्वांत यशस्वी चित्रपट आहे. आता याचा प्रीक्वल येणार आहे. चित्रपटाच्या प्रोड्यूसर्सने रिलीजच्या 100 दिनसांचं सेलिब्रेशन दरम्यान याच्या प्रीक्वलची घोषणा केली. या चित्रपटाची पुढील माहीती लवकरच दिली जाणार आहे.

ऋषभ शेट्टींनी प्रीक्वलची घोषणा करताना म्हटले की, ‘आम्हाला खूप आनंद होत आहे आणि प्रेक्षकांचे आभारी आहोत. ज्यांनी आमच्यावर प्रेम आणि पाठिंबा दिला. हा प्रवास पुढे नेला. देवाच्या आशीर्वादाने यशस्वी 100 दिवस पूर्ण करण्यात आले आहेत. या खास क्षणी कांताराच्या प्रीक्वेलची घोषणा करत आहोत. चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे.

ऋषभ शेट्टींनी सांगितलं की, ‘तुम्ही जो पाहिला तो पार्ट 2 होता. आता पुढील वर्षी पार्ट 1 येईल. जेव्हा मी ‘कांतारा’ ची शूटिंग करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की, कांताराच्या इतिहासात त्याची आणखी खोली आहे. राइटिंग पार्टबद्दल सांगायचं तर, सध्या आम्ही त्यावर जास्त काम करत आहोत. कारण रिसर्च अजून सुरू आहे. त्यामुळे आताच चित्रपटाबद्दल सांगणं घाई करणं होईल.

ऋषभ शेट्टी स्टारर हा चित्रपट 30 सप्टेंबरला रिलीज झाला होता. रिलीजच्या सुरुवातीला चित्रपटाची कमाई खूप मंद होती मात्र हळूहळू जबरदस्त कमाई सुरू झाली. त्यानंतर 14 ऑक्टोबरला हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषांमध्ये रिलीज करण्यात आला,.

Tags

follow us