Download App

Rishi Saxena: अभिनेता ऋषी सक्सेना दिसणार हिंदी चित्रपटात; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Malhar Movie: ऋषी ( Rishi Saxena) आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे आणि याच निमित्त देखील तितकच खास आहे.

Rishi Saxena: ‘काहे दिया परदेस’ (Kahe Diya Pardes) या मालिकेतून मराठी इंडस्ट्रीत ऋषी सक्सेना (Rishi Saxena) या कलाकारांच पदार्पण झालं तेव्हापासून आजपर्यंत तो अनेक अनोख्या भूमिका साकारताना दिसला. (Hindi Movie) अगदी टीव्ही पासून ते चित्रपट, शॉर्ट फिल्म्स, वेगवेगळ्या म्युजिक अल्बममध्ये त्याने उत्तम कामगिरी केली आहे.


ऋषी आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे आणि याच निमित्त देखील तितकच खास आहे. “मल्हार” (Malhar Hindi Movie) या हिंदी चित्रपटात तो अनेक हिंदी कलाकारांच्या सोबतीने प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. ऋषी अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन कायम जिंकल आहे.

हिंदीत चर्चेत असलेल्या शारिब हाश्मी, अंजली पाटील आणि कलाकारांच्या सोबतीने तो “मल्हार” या हिंदी चित्रपटात झळकणार असून येत्या 31 मे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मैत्री आणि त्याची अनोखी गोष्ट मल्हार मधून उलगडणार असून पुन्हा एकदा ऋषी ला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

Housefull 5: काय सांगता! अनिल कपूरने नाकारला अक्षयचा ‘हाऊसफुल 5’, जाणून घ्या कारण…

ऋषीने आजवर अनेक दर्जेदार चित्रपट मालिकामध्ये काम केलं आहे आणि स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता पुन्हा ऋषी काय वेगळी भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे. मालिकांसोबतच ऋषीने सिनेमात काम करुन चाहत्यांचा मनोरंजन केलं. ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘रेनबो’ या सिनेमातून ऋषी मोठ्या पडद्यावर झळकला.

दरम्यान अभिनेता ऋषी सक्सेना आणि अभिनेत्री ईशा केसकर रिलेशनशिपमध्ये आहेत. ऋषी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. आणि अनेकदा ते एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसत असतात. सोशल मीडियावर ऋषीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.

follow us