Rocketry: The Numbi Effect : सिने विश्वातील लोकांभोवती प्रचंड झगमगाट असतो. लक्सरी लाईफ, फॅन्स, पैसा याव्यक्तिरिक्त या सेलिब्रिटींना भोवताचं जग दिसत नाही, असं सर्रास बोलल्या जातं. मात्र, रॉकेट्री : द नंबी इफेक्टच्या टीमने या गैरसमजाला छेद देत माणूसकीचं दर्शन घडवलं. रॉकेट्री : द नंबी इफेक्ट (Rocketry: The Numbi Effect) या चित्रपटाच्या टीमने सामाजिक जाणीवेतून एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या टीमने काही वंचित घटकातील मुलांच्या शस्त्रक्रिया (Heart surgery) करण्याचं ठरवलं.
Hema Upadhyay Murder Case : पती चिंतन उपाध्यायसह अन्य तिघांना जन्मठेपेची शिक्षा!
मनोरंजन विश्वातील प्रतिष्ठित आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची 24 ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली. यावर्षी 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या आर माधवनच्या रॉकेट्री : द नंबी इफेक्ट या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच या चित्रपटाच्या टीमने एक अनोखा उपक्रम हाती घेतला. ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाच्या टीमने मूलन फाउंडेशनच्या धर्मादाय कार्यक्रमात केरळमधील काही वंचित मुलांसाठी हृदय शस्त्रक्रिया करण्याची अनोखी मोहीम हाती घेतली आहे.
चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर चित्रपटाचे निर्माते वर्गीस मूलन आणि विजय मूलन यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. आर माधवन यांनी देखील मूलन फाऊंडेशनसोबत सहकार्य करत जन्मताच हृदय विकार असलेल्या 60 मुलांवर शस्त्रक्रिया कऱण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी 7 ऑक्टोबर रोजी कोचीच्या अंगमाली येथील अॅडलक्स इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या मोहिमेची घोषणा केली आहे.
या मोहिमेमुळं केरळमधील वंचित मुलांवर हृदय शस्त्रक्रिया होणार आहेत. मलून फाऊंडेशन आणि आर माधवनमुळं अनेकांचे आयुष्य उजळणार आहे. दरम्यान, रॉकेट्री: द नंबी इफेक्टने सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारवर आपली मोहोर उमटवली आहे. अभिनेता आर. माधवन यांच्यासाठी हा एक हृदयस्पर्शी क्षण होता.
चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार साजरा करण्यासाठी रॉकेट्री चित्रपटाचे निर्माते वर्गीस मूलन आणि विजय मूलन यांनी सामाजिक जाणीवेतून एक उदात्त उपक्रम सुरू केला. वर्गीस यांनी केरळमधील वंचित मुलांसाठी ६० हून अधिक हृदय शस्त्रक्रिया करण्याचा अनोखा उपक्रम केला. त्यातून मुलांच्या जीवन बहरणार आहे.
‘रॉकेट्री : द नम्बी इफेक्ट’ या चित्रपटाच्या कथेचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या चित्रपटात आर. माधवन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट जगभरात हिंदी, इंग्रजी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड अशा सहा भाषांत प्रदर्शित झाला होता.