Hema Upadhyay Murder Case : पती चिंतन उपाध्यायसह अन्य तिघांना जन्मठेपेची शिक्षा!

Hema Upadhyay Murder Case : पती चिंतन उपाध्यायसह अन्य तिघांना जन्मठेपेची शिक्षा!

Hema Upadhyay Murder Case : मुंबईतील प्रसिद्ध कलाकार हेमा उपाध्याय(Hema Upadhyay) आणि त्यांच्या वकिलाच्या हत्येप्रकरणी दिंडोशीच्या विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान दिंडोशी विशेष न्यायालयाने हेमा उपाध्याय(Hema Upadhyay) यांच्या पतीसह अन्य तिघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.वाय.भोसले यांच्या विशेष न्यायालयासमोर ही सुनावणी पार पडली.

‘इंग्रजांची चाकरी केल्यानेच ‘ठाकूर’ पदवी… त्यांच्यात इंग्रजांचाच डीएनए’; अनिल बोडेंची जीभ घसरली

सुनावणीदरम्यान, फिर्यादी पक्षाकडून सर्व दोषींना जास्तीत जास्त फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. चिंतन उपाध्याय यांना आयपीसी कलम 120(बी) आणि 109 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. या शिक्षेनंतर जामिनावर बाहेर असलेल्या चिंतन उपाध्यायला शनिवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चिंतन उपाध्यायला हेमा उपाध्याय यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली लगेचच अटक करण्यात आली होती. सप्टेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करण्यापूर्वी चिंतन उपाध्याय सहा वर्षे तुरुंगात होता.

Rajasthan Election : भाजपची रणनीती ठरली! राजस्थानातही MP चाच फॉर्मुला; सत्ता खेचण्यासाठी 7 शिलेदार रिंगणात

आरोपींनी एका वकिलाचीही हत्या केली आहे. हा एकप्रकारे न्यायव्यवस्थेवरील हल्ला आहे. परिणामी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली. हेमा आणि तिच्या वकिलाच्या हत्येचा छडा लावू न शकलेल्या पोलिसांनी आपल्या वैवाहिक कलहाचा गैरफायदा घेतला. तसेच आपल्याला लक्ष्य करून या प्रकरणी गोवले, असल्याचा दावा चिंतनच्या वकीलाकडून न्यायालयात करण्यात आला होता. अटकेनंतर पोलिसांनी बळजबरीने आपला कबुली जबाब घेतला. त्यासाठी पोलिसांनी आपला अतोनात छळ केल्याचा दावाही उपाध्याय याने केला होता.

‘टोल’ राज्यातील मोठा घोटाळा, शहानिशा करा!’; व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी केली पोलखोल

कौटुंबिक वादामुळे हेमा उपाध्याय आपल्या पतीपासून वेगळ्या राहत होत्या. हेमा उपाध्याय यांचे पती चिंतन उपाध्याय यांच्यासह अन्य तीन जणांनी हेमा उपाध्याय आणि वकील हरेश भंबानी यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. या हत्येप्रकरणी शनिवारी दिंडोशी न्यायालयाने चिंतन उपाध्यायसह शिवकुमार राजभर, प्रदीप राजभर और विजय राजभर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

हेमा उपाध्याय आणि हरेश भंबानी यांची 11 डिसेंबर 2015 रोजी हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर दोघांचाही मृतदेह मुंबईतील कांदिवली परिसरात एका नाल्यात आढळून आला होता. या दुहेरी खुनाच्या घटनेनंतर मुंबईत एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी मृतदेहाची चौकशी केल्यानंतर दुसरा मृतदेह हा वकिला असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडून चौकशी केली असता चिंतन उपाध्याय यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube