रणवीरच्या ‘Rocky Aur Rani Ki Prem Kahaani ’ची छप्परफाड कमाई; तीन दिवसात कमावले ‘इतके’ कोटी

Box Office Collection: करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahaani) हा सिनेमा २८ जुलै विषयी चाहत्यांच्या भेटीला आला. या सिनेमातील अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे. वीकेंडला सिनेमाच्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. […]

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani

Box Office Collection: करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahaani) हा सिनेमा २८ जुलै विषयी चाहत्यांच्या भेटीला आला. या सिनेमातील अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे. वीकेंडला सिनेमाच्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाने काल रविवारी (30 जुलै) म्हणजेच रिलीजच्या तिसर्‍या दिवशी मोठ्या प्रमाणात कामे केली आहे.


‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाची जादू सध्या बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी ११.१० कोटींचा गल्ला केला आहे. वीकेंडला हा सिनेमा बघण्यासाठी चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली आहे. शनिवारी सिनेमाच्या कमाईमध्ये ४४.५९ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आहे. शनिवारी या सिनेमाने १६.५ कोटी रुपयांचा गल्ला केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाने रिलीजच्‍या तिसर्‍या दिवशी म्हणजेच रविवारी १८ कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. यानंतर या सिनेमाची ३ दिवसांची एकूण कमाई आता ४५.१५ कोटींवर असल्याचे समजले आहे.’रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात  आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्याबरोबर जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे मुख्य कलाकारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच सारा अली खान आणि अनन्या पांडे यांच्या देखील या सिनेमात छोट्या भूमिका असल्याचे पाहायला मिळाले आहे.

https://letsupp.com/entertainment/siddharth-jadhav-new-marathi-movie-73686.html

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात रंधावा आणि चॅटर्जी या दोन कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या सिनेमात रॉकी आणि रानी या कपलची कथा मांडण्यात आली आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधून करण जोहरने ७ वर्षांनी दिग्दर्शनात पुन्हा एकदा पुनरागमन केले आहे. या सिनेमाचे कथानक इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिले आहे. धर्मा प्रॉडक्शन आणि वायकॉम १८ स्टुडिओज यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

Exit mobile version