‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा बॉक्स ऑफिसवर जलवा; दुसऱ्या दिवशीही दमदार कमाई

RRKPK Day 2 Collection : अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चे बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन सुरु आहेत. चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांच्यासह अनेक कलाकार आहेत. […]

RRKPK Day 2 Collection

RRKPK Day 2 Collection

RRKPK Day 2 Collection : अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चे बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन सुरु आहेत. चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांच्यासह अनेक कलाकार आहेत. पहिल्या दिवसाच्या दमदार कमाईनंतर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा दिसून येत आहे.

‘ए दिल है मुश्किल’नंतर करण जोहरने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी दिग्दर्शित केला आहे. सात वर्षांनंतर करणचे हे पुनरागमन यशस्वी झाले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पहिल्या दिवशी 11.50 कोटींच्या चांगल्या कलेक्शनसह सुरुवात केल्यानंतर, चित्रपटाने शनिवारी 16 कोटी कमावले आहेत (हे सुरुवातीचे अंदाज आहेत). या संदर्भात, चित्रपटाचा दोन दिवसांचा एकूण व्यवसाय 27.10 कोटींवर आहे.

IPL 2024 बद्दल मोठी बातमी… परदेशात होणार स्पर्धा, जाणून घ्या कारण

आता या वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत काही फरक पडणार की नाही ते येणार काळच सांगले. दरम्यान फॅमिली ड्रामा असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये ‘गली बॉय’ नंतर पुन्हा एकदा आलिया आणि रणवीर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात आलियाने बंगाली मुलीची तर रणवीरने पंजाबी मुलाची भूमिका साकारली आहे.

Exit mobile version