IPL 2024 बद्दल मोठी बातमी… परदेशात होणार स्पर्धा, जाणून घ्या कारण

  • Written By: Published:
IPL 2024 बद्दल मोठी बातमी… परदेशात होणार स्पर्धा, जाणून घ्या कारण

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आयपीएलच्या पुढील म्हणजेच 2024 हंगामाची तयारी करत आहे. तसेच पुढील आयपीएल परदेशातही होण्याची शक्यता आहे.

याचे प्रमुख कारण पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका हे आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल 2024 साठी विंडो शोधून ही स्पर्धा लवकर होऊ शकते. आम्हाला माहीत आहे की निवडणुका होणार आहेत आणि या सर्व गोष्टी आमच्या योजनेत समाविष्ट आहेत. (ipl 2024 to start early due to lok sabha elections and chance of indian premier league being staged in a foreign country tspo)

गरज भासल्यास पुढील वर्षी मार्चच्या सुरुवातीला आयपीएल होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. तसेच, मे महिन्याच्या मध्यात त्याची सांगता होऊ शकते. तथापि, सध्या आमचे संपूर्ण लक्ष या वर्षी भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 वर आहे. आयपीएलला अजून बराच वेळ शिल्लक आहे. गोष्टी कशा पुढे जातात ते पाहूया.

परदेशातही स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतात

परदेशात आयपीएल आयोजित करण्याबाबत बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, याआधीही आम्ही निवडणुका आणि स्पर्धा दोन्ही चांगल्या प्रकारे सांभाळल्या आहेत. गरज भासल्यास आयपीएल 2024 परदेशातही करता येईल. मात्र, आमची पहिली प्राथमिकता ही स्पर्धा फक्त भारतातच आयोजित करण्याला असेल. सध्याच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. अजून बराच वेळ असला तरी आता त्याबद्दल बोलू नये.

Asia Champion कुस्ती स्पर्धेत जामखेड गाजलं; सुजय तनपुरेला सुवर्णपदक

मागील आयपीएल म्हणजेच 2023 च्या हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघ चॅम्पियन बनला होता. त्याने अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. यासह मुंबई इंडियन्स आणि चेन्नई हे दोन्ही संघ 5-5 वेळा बरोबरीने विजेतेपद पटकावणारे संघ बनले आहेत.

लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल दोनदा रद्द करण्यात आले

लोकसभा निवडणुकीमुळे आतापर्यंत 2 वेळा IPL भारताबाहेर काढण्यात आली आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत केले होते. यानंतर 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल काही भागांत पार पडली. त्यानंतर अर्धी स्पर्धा भारतात, तर उर्वरित सामने यूएईमध्ये झाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube