Asia Champion कुस्ती स्पर्धेत जामखेड गाजलं; सुजय तनपुरेला सुवर्णपदक

Asia Champion कुस्ती स्पर्धेत जामखेड गाजलं; सुजय तनपुरेला सुवर्णपदक

Asia champion : आशिया चॅम्पियन (Asia champion) कुस्ती स्पर्धेत भारताचंच नाही तर अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडचं नाव देखील जागतिक स्तरावर पोहचलं आहे. कारण जामखेड तालुक्यातील शिऊर येथील पै.सुजय नागनाथ तनपुरे यांनी 68 किलो गटा मध्ये आशिया चॅम्पियन ( Asia champion ) कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवले आहे. (Ahmednagar Jamkhed Sujay Tanpure got Gold Medal in Asia champion )

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना

त्यानंतर सुजय जेव्हा भारतात परतला तेव्हा लोहगाव, पुणे विमानतळावर पै सुजय नागनाथ तनपुरे यांचे जोरदार स्वागत करून डि. वाय.एस्. पी. विजय चौधरी ( तिन वेळा महाराष्ट्र केसरी), उप महाराष्ट्र केसरी तथा मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशन चे अध्यक्ष बबन (काका) काशिद यांनी सत्कार व अभिनंदन केले.

कलम 370- पाकिस्तान अनेक देशांत 5 ऑगस्टपासून भारतविरोधी निदर्शने करणार

12 ते 18 जुलै दरम्यान जॉर्डनच्या अम्मान शहरात होणाऱ्या अशिया कुस्ती स्पर्धेसाठी सोनीपतच्या बहलगड येथील साई सेंटरमध्ये चाचण्या घेण्यात आल्या होत्या. सुमा शिरूर, SAI कार्यकारी संचालक ललित शर्मा, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महासिन्हा राव, अलका सोमर, स्पर्धा संचालक ग्यान सिंग, स्पर्धा व्यवस्थापक राजीव तोमर, अनिल मान, फ्रिस्टाइल मुख्य प्रशिक्षक जगमिंदर सिंग, ग्रीको रोमन मुख्य प्रशिक्षक हरगोविंद सिंग, साईओ वुशू यांच्या देखरेखीखाली या चाचण्या पार पडल्या.

त्यानतर तिसऱ्या दिवशी, 655 कुस्तीपटूंनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) उत्तर प्रादेशिक केंद्र, बहलगड येथे तदर्थ समितीच्या वतीने अंडर-15 आणि 20 अशियाई कुस्ती स्पर्धेसाठी घाम गाळाला. यामध्ये 14 जणांची निवड करण्यात आली. त्यानंतर तदर्थ समिती सदस्य भूपेंद्र बाजवा आणि भारती ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस कल्याण चौबे यांच्या उपस्थितीत या चाचण्या घेण्यात आल्या. यात 14 जणांची निवड करण्यात आली. त्यात 4 जण महाराष्ट्रतील होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube