Download App

Box Office Collection: Ranveer-Aliaच्या ‘रॉकी ओर रानी की प्रेमकहानी’ने केला 100 कोटींचा आकडा पार

Box Office Collection: आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई ही केली आहे. (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani ) या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी सुमारे ११.५ कोटींचा व्यवसाय करणाऱ्या या चित्रपटाने रविवारी सुमारे १३.८२ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत १०५ कोटी रुपयांची कमाई ही केली आहे.

रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ची सुरुवात कशी झाली? :’रॉकी और रानी की प्रेम कहानी’ च्या कलेक्शनमध्ये दुसऱ्या दिवशी सुमारे ४५% वाढ झाली. या सिनेमाने शनिवारी १६.५ कोटींचा व्यवसाय केला. यासह ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ने अवघ्या २ दिवसांत देशभरात २७.१५ कोटींचा व्यवसाय केला.

ओपनिंग वीकेंडला किती कोटींची कमाई झाली? : ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाच्या रविवारच्या कमाईबद्दल बोलायचे तर या सिनेमाने रविवारी पुन्हा एकदा वेग वाढवला. या दिवशी चित्रपटाने १८.७५ कोटींचा गल्ला जमवला. दुसरीकडे, सिनेमाने ओपनिंग वीकेंडला एकूण 52.92 कोटींची कमाई केली.

सिनेमाने सोमवारची किती केली कमाई : या आठवड्याच्या शेवटी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने सोमवारी काही खास कमाई केली नसून कमाईच्या बाबतीत आकडा अपेक्षेएवढा वाढला नाही आहे. सोमवारी या सिनेमाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर फक्त ७.५० कोटी कमाई केली. यासह, आतापर्यंत एकूण ५२.९२ कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २३०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. आलिया आणि रणवीर व्यतिरिक्त या चित्रपटात धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांसारख्या दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. २०१९च्या रिलीज झालेल्या ‘गली बॉय’ नंतर पहिल्यांदा आलिया आणि रणवीर एकत्र काम करत आहेत.

Tags

follow us