Download App

Brahmastra 2 मध्ये दिसणार ‘रॉकी भाई’? अयान मुखर्जींनी सांगितली रिलीज डेट

मुंबई : लॉकडाउननंतर बॉलिवूडचं बॉक्स ऑफिस मंदावल होते. त्यानंतर दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचा ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन – शिवा’ रिलीज झाला. वेळोवेळी या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत होती. मात्र त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात आला. या चित्रपटाने चांगली कमाई केली. आता या चित्रपटाचा दूसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणारआहे.

दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी नुकतचं ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा दूसरा पार्टबद्दल सांगितले आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं नाव ‘ब्रह्मास्त्र: पार्ट टू – देव’ असं असणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार होता. मात्र आता दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी नुकतचं सांगितले की, या चित्रपटाचा दूसरा पार्ट 2025 पर्यंत रिलीज होणार आहे. मात्र यावेळी अयान मुखर्जीने हे देखील सांगितले की, आम्ही 10 वर्ष लावणार नाही. कारण 10 वर्षांनी दुसरा पार्ट आला तर प्रेक्षक चित्रपट पाहणार नाही.

Marrige retuals : डीजे नाही, ‘ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात’ निघाली नवरदेवाची वरात

त्याचबरोबर या चित्रपटामध्ये कोणकोणते कलाकार असणार याची देखील उत्सुकता लागली आहे. कारण रणबीर कपूर आणि आलिया भट चित्रपटात असणार की नाही यावर शंका उपस्थित केल्या जात आहेत. तसेच ‘देव’ चा रोल कोण करणार ‘ब्रह्मास्त्र: पार 2 – देव’ यासाठी रणवीर सिंग नाव घेतलं जात आहे. तर कधी यशच, तर कधी ऋतिक रोशनचं. पण यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

अयानने सांगितले की, तो जवळपास सात वर्षांपासून ‘ब्रह्मास्त्र’च्या स्क्रिप्टवर काम करत आहे. त्याला त्याचा ड्रीम फिल्म खूप चांगला बनवायचा आहे, त्याला थोडा जास्त वेळ लागला तरी चालेल. त्यामुळे प्रेक्षकांच्या गरजा लक्षात घेऊन ‘वेक अप सीड’चे दिग्दर्शक चित्रपटाची घाई करण्यास टाळाटाळ करत आहेत.

Tags

follow us