Marrige retuals : डीजे नाही, ‘ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात’ निघाली नवरदेवाची वरात

Marrige retuals : डीजे नाही, ‘ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात’  निघाली नवरदेवाची वरात

अहमदनगर : सध्या लग्न म्हंटले की पाच- दहा लाखांचा चुराडा ठरलेलाच असतो. त्यात लाखाचा डीजे, उडत्या चालीची गाणी, मद्यधुंद मित्रमंडळींचे धुडगूस घालणारे नृत्य, मुहूर्त टळून गेला. तरी रस्त्यावरच रेंगाळणारी नवरदेवाची वरात असे चित्र पाहायला मिळते. परंतु याला फाटा देत नगर तालुक्यातील हातवळण (देवीचे) येथे शिंदे परिवाराचा विवाह सोहळा वारकरी परंपरेत पूर्ण धार्मिक पद्धतीने पार पडला. 

शिवाजी अश्रु शिंदे यांनी आपला मुलगा किरण याचा विवाह अगदी पारंपरिक पद्धतीने आयोजित केला होता. 27 फेब्रुवारीला हातवळण येथेच हा विवाह पार पडला. यात त्यांनी समाजप्रबोधनात्मक उपक्रम म्हणून वरातीतील उनाड डान्स ऐवजी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. विशेष म्हणजे साखरपुडा, हळद, लग्न हे तीनही सोहळे एकाच दिवशी टाळ मृदंगाच्या गजरात पार पडले.

31 मार्चनंतर विना हॉलमार्क सोनं विकण्यास मनाई, नकली सोनं विक्रीला बसणार चाप

या उपक्रमाने अनावश्यक खर्च ही टळला. दुपारी नवरदेवाची वरात डीजेऐवजी टाळ वाजवत ‘ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात पार पडली.वारकरी वेशातच नातेवाईक, मित्रमंडळी या दिंडीत सहभागी झाले. नवरदेवानेही हातात टाळ घेत या दिंडीत सहभाग घेतला. दरम्यान, दुसरीकडे लग्नमंडपात सुनील महाराज झांबरे यांचे कीर्तन सुरू होते. आलेले वऱ्हाडी कीर्तनात तल्लीन झाले होते. कीर्तनानंतर सीता स्वयंवराचा अभंग व शेवटी मंगलाष्टक होऊन हा विवाह पार पडला. लग्न समारंभात वरातीऐवजी कीर्तन ठेवल्याने  शिंदे परिवाराच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सगळीकडे कौतुक होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube