31 मार्चनंतर विना हॉलमार्क सोनं विकण्यास मनाई, नकली सोनं विक्रीला बसणार चाप

31 मार्चनंतर विना हॉलमार्क सोनं विकण्यास मनाई, नकली सोनं विक्रीला बसणार चाप

मुंबई : अडचणीच्या काळात सोन्याइतका दुसरा भरोशाचा मित्र नाही. अनेक भारतीय कुटुंब आजही परंपरागत पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करतात. मात्र सोन्याच्या शुद्धतेवर नेहमी प्रश्न उपस्थित केले जातात. अनेकदा सोन्यासारखी मौल्यवान खरेदी करतांना ग्राहकांची फसवणूक होते. 22 कॅरेट सोने (22 Carat Gold) असल्याचा दावा करत कमी कॅरेटचे दागिने माथी मारल्या जातात. पण आता असं होणार नाही आहे. केंद्र सरकारने सोने आणि दागिन्यांच्या खरेदी-विक्रीच्या नियमात बदल केला आहे. 31 मार्च 2023 नंतर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) विना सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृती विकल्या जाणार नाहीत.

अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियूष गोयल यांनी शुक्रवारी भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या कार्यवाहीचा एका बैठकीत आढावा घेतला. मायक्रो स्केल युनिट्समध्ये गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी BIS विविध उत्पादन प्रमाणीकरण योजनांमध्ये (certification schemes) प्रमाणीकरण तसेच किमान मार्किंग शुल्कावर (certification/minimum marking fee) 80 टक्के सवलत देईल, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

हॉलमार्क केलेल्या सोन्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे सोने किती कॅरेटचे आहे हे त्यावर लिहिलेले असते. याशिवाय दागिन्यांमध्ये किती टक्के सोने आहे, याचीही नोंद दागिन्यांवर केली जाते. हॉलमार्किंग हे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र आहे. हे 16 जून 2021 पर्यंत ऐच्छिक होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला. पहिल्या टप्प्यात 256 जिल्ह्यांमध्ये हे अनिवार्य करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात आणखी 32 जिल्ह्यांत हे अनिवार्य आले. आता एकूण 288 जिल्ह्यांत हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. यात आणखी आत 51 जिल्हे जोडले जात आहेत.

1 एप्रिल 2023 पासून हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन असलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीला परवानगी असेल, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी सांगितले की, ग्राहकांच्या हितासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे की 31 मार्चनंतर, HUID विना हॉलमार्क केलेल्या सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींच्या विक्रीस परवानगी दिली जाणार नाही. सध्या चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) सध्या वापरले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कसब्या रासनेंच्या झालेल्या पराभवाचं खापर ‘या’ 6 नेत्यांवर फुटणार

दरम्यान, गोल्ड हॉलमार्किंगचे नियम फक्त ज्वेलर्ससाठी आहेत. हे ग्राहकांना लागू होत नाहीत. ज्वेलर्स आता ग्राहकांना हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकू शकत नाहीत, पण तरीही ग्राहक आपले जुने दागिने पूर्वीप्रमाणेच ज्वेलर्सला हॉलमार्कशिवाय विकू शकतो. त्यामुळे ग्राहकावर याचा फारसा परिणाम होणार नाही.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube