TDM: भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ (TDM) हा सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. राज्यामध्ये ज्या ज्या थिएटर्समध्ये सिनेमा प्रदर्शित झाला, तिथे त्याला चांगलं ओपनिंग मिळाले आहे. पण अनेक ठिकाणी ‘टीडीएम’चे शो कॅन्सल केले गेले असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. तसेच सिनेमाला प्राईम टाईम (Prime Time) मिळत नसल्याचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Director Bhaurao Karhade) आणि टीमने याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केले आहे.
एका सिनेमागृहात याबद्दल बोलत असताना यातील कलाकारांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. तो व्हिडिओ आज देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर ठीकठिकाणी या सिनेमाची चर्चा व्हायला सुरुवात झाली. सोशल मीडियावर तर बऱ्याच लोकांनी या सिनेमाला पाठिंबा दर्शवला आहे. पण या सगळ्या गोष्टीमुळे भाऊराव कऱ्हाडे यांनी हा सिनेमा सिनेमागृहातून काढून घ्यायचा निर्णय घेतला आहे.
आता त्यानंतर ९ जूनला हा सिनेमा पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला आहे. तरी अजून परिस्थिती जैसे थेच असल्याचे दिसून आली आहे. अद्याप सिनेमाला प्राइम टाइम म्हणजेच संध्याकाळ आणि रात्रीचे शोज मिळाले नाहीत. नुकतंच कर्जत जामखेडचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या सिनेमाच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर करत या सिनेमाला प्राइम टाइम मिळावा, अशी विनंती केली आहे.
Kajol : ‘आयुष्यातील कठीण टप्प्यातून जात आहे’ म्हणत काजोलनं उचललं मोठं पाऊल !
‘चित्रक्षा निर्मिती’ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर रोहित पवार यांची ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले आहे की, “मराठी कलाकार जिद्दी, कष्टाळू आहे, तो व्यवस्थेसमोर झुकत नाही, तो विनम्र होतो केवळ प्रेक्षकांसमोर. यावेळी ‘TDM’ या सिनेमाला प्राइम टाइम शो देऊन सिनेमागृहाच्या मालकांनी सहकार्य करायला हवं. अशी पोस्ट त्यांनी यावेळी शेअर केली आहे.
पडद्यावर उडणार रांगड्या बैलगाडा शर्यतीचा धुराळा
याबरोबरच आपण सगळ्यांनी हा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहून अशा मराठमोळ्या सिनेमाना प्रोत्साहन द्यायला हवं, असंही रोहित पवार या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. या सिनेमातून कालींदी निस्ताने आणि पृथ्वीराज थोरात हे दोन नवे चेहेरे लोकांसमोर आले आहेत. यासोबतच सिनेमाचे कथानकही वेगळ्याच धाटणीचे असल्याचे सांगितले जात आहे.