Kajol : ‘आयुष्यातील कठीण टप्प्यातून जात आहे’ म्हणत काजोलनं उचललं मोठं पाऊल !

Kajol

Kajol Delete Insta Post : अभिनेत्री काजोल तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असण्यामुळे चर्चेत असते. तिचं फोटोशूट, स्टाईल आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. तिच्या सोशल मीडिया पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचबरोबर तिच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊसच पडत असतो. मात्र आता काजोलच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजे काजोलने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तिने यावेळी एक संभ्रमात टाकणारी माहिती देखील दिली आहे. ( Kajol Take break from social media Delete Insta Post )

Gadar2 controversary: रिलीजपूर्वी ‘गदर 2’ अडकला वादात? नेमकं कारण काय घ्या जाणून

तिने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही घोषणा केली आहे. तसेच तिने आपल्या अकाऊंटवरील सर्व जुन्या पोस्ट देखील डिलीट केल्या आहेत. सोशल मिडीयापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देणाऱ्या या पोस्टमध्ये काजोलने कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, ‘सोशल मिडीयापासून ब्रेक घेत आहे.’ त्यामुळे आता तिच्या सोशल मिडीया पोस्टची आतुरतेने वाट पाहणारे तिचे लाखो चाहते नाराज झाले आहेत एवढं नक्की.

View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

मात्र या पोस्टमध्ये एक एक संभ्रमात टाकणारी माहिती देखील दिली आहे. ती म्हणाली की, ‘आपण आयुष्यातील कठीण टप्प्यातून जात आहोत.’ त्यामुळे काजोलच्या आयुष्यात नेमकं काय घडलयं? ज्यामुळे तिने आपल्या अकाऊंटवरील सर्व जुन्या पोस्ट डिलीट करत. सोशल मिडीयापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ‘आपण आयुष्यातील कठीण टप्प्यातून जात आहोत.’ असं म्हटल्याने तिच्याबद्दल चाहत्यांना चिंता वाटायला लागली आहे. तिला नेमक काय झालंय? हे जाणून घेण्यासाठी कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे.

Shreyas Talpade: जितेंद्र जोशीनं सांगितलेली आठवण ऐकून श्रेयस झाला भावूक; म्हणाला, ‘स्वामींच्या मठात…’

दरम्यान अभिनेत्री काजोल काही दिवसांपूर्वी सलाम वेंकी या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाला चाहत्यांनी पसंती देखील दिली त्यानंतर आता ती लस्ट स्टोरी-2 या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात येणार नसून ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us