Download App

Rohit Saraf: रोहित सराफच्या ‘इश्क विश्क रिबाउंड’ मधील ‘छोटे दिल पे लगी’ धमाकेदार गाणं रिलीज

Chot Dil Pe Lagi Song: रोहित सराफच्या सिनेमातील 'छोटे दिल पे लगी' ( Chot Dil Pe Lagi Song) धमाकेदार गाणं रिलीज करण्यात आला आहे.

Ishq Vishq Rebound Chot Dil Pe Lagi Song Release: बॉलीवूडमध्ये (Bollywood) चॉकलेट बॉईज आणि त्यांचा रोमान्स यांचा चर्चा नेहमीच होताना दिसतात. अश्यातच अभिनेता रोहित सराफ (Rohit Saraf) ‘इश्क विश्क रिबाउंड’ (Ishq Vishk Rebound) सोबत पुन्हा एकदा रोमान्सचे युग परत आणण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ची आजची आवृत्ती आहे. मूळ चित्रपटात शाहीद कपूर (Shahid Kapoor) चॉकलेट बॉय लूक देत असताना नवीन चित्रपट रिबाउंडवर आधारित आहे. आता सिनेमातील ‘छोटे दिल पे लगी’ धमाकेदार गाणं रिलीज करण्यात आला आहे.

‘इश्क विश्क प्यार व्यार’ च्या रीबूटने चाहत्यांना आणि प्रेक्षकांना नॉस्टॅल्जिक ट्रिपवर घेऊन गेल्यानंतर ‘इश्क विश्क रिबाउंड’च्या निर्मात्यांनी आणखी एक आयकॉनिक गाणं ‘ छोटे दिल पे लागी’ रिलीज केलं आहे. असीस कौर आणि वरुण जैन यांनी गायलेल्या या गाण्यात रोहित सराफसह पश्मिना रोशन आणि नायला ग्रेवाल दिसत आहेत. पहिल्या फ्रेमपासून रोहित चमकत असून हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक अभिनेता म्हणून ती नावारूपास येत आहे.

रोहितने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर हे गाणं शेयर केलं आहे. #ChotDilPeLagi असे कॅप्शन देत अभिनेता रोहित सराफने गाणे रिलीज केले आहे. अभिनेत्याच्या या गाण्याने मंत्रमुग्ध करणार संगीत आणि रोहितच्या अनोख्या अदा यातून रोहितचा रोमँटिक अंदाज दाखवून देत आहे. हा ट्रॅक नक्कीच सुपरहिट ठरणार आहे, यात शंका नाही . गाण्याचे बोल गुरप्रीत सैनी यांनी लिहिले आहेत तर संगीत रोचक कोहलीने दिले आहे.

‘BMCM’ चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा फटका; रिलीज झाल्यानंतर काही तासातच चित्रपट लीक

निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित हा बॉलीवूडमधील रोम-कॉम युग परत आणेल याची खात्री आहे. ‘इश्क विश्क रिबाउंड’ व्यतिरिक्त रोहितकडे काही रोमांचक काम आहेत. तो ‘मिसमॅच 3’ मध्ये त्याचे लाडके पात्र ‘ऋषी सिंग शेखावत’ पुन्हा साकारणार आहे आणि धर्मा प्रॉडक्शनचे ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ देखील त्याच्याकडे आहे.

follow us

वेब स्टोरीज