मुंबई : हिंदीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी आता मराठीत पदार्पण करत आहे. त्याच्या पहिल्या-वहिल्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. स्कुल कॉलेज आणि लाईफ असं त्याच्या या मराठी चित्रपटाचं नाव आहे.
खलिस्तानींचा हैदोस! अमेरिकेतल्या भारतीय दुतावासावर हल्ला…
तेजस्विनी प्रकाश आणि करण परब या दोघांच्या यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन मात्र रोहीत शेट्टीने नाही तर विहान सुर्यवंशी याने केलं आहे. तर रोहित शेट्टीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
http://bit.ly/SchoolCollegeAniLifeTrailer
रोहित शेट्टीचं मराठीत पदार्पण आणि तेजस्विनी प्रकाश आणि करण परब या दोघांच्या मुख्य भूमिका यामुळे या चित्रपटाला मोठं स्वरूप प्राप्त झाला आहे. हा एक कौंटुंबिक मनोरंजक चित्रपट आहे.
या चित्रपटाच्या नावाप्रमाणे ट्रेलरमध्ये देखील ते दिसत आहे की, कशा प्रकारे काही तरूण आपल्या शाळा आणि कॉलेजमधील जीवनातील समस्यांचा सामना करतात.
माहिती अधिकार कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांचे निधन
रिलायन्स एंटरटेनमेंटच्या सहकार्याने रोहित शेट्टी, पवित्रा गांधी आणि विवेक शाह निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांनी केले आहे. हा एंटरटेनर 14 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.