खलिस्तानींचा हैदोस! अमेरिकेतल्या भारतीय दुतावासावर हल्ला…

खलिस्तानींचा हैदोस! अमेरिकेतल्या भारतीय दुतावासावर हल्ला…

ब्रिटनमध्ये भारतीय दुतावासावर हल्ला केल्यानंतर आता अमेरिकेत खलिस्तानींने हैदोस घातला आहे. पंजाबमध्ये अमृतपाल सिंग यांच्याविरोधात कठोर कारवाई केल्याच्या निषेधार्थ खलिस्तान समर्थकांनी हा हल्ला केला आहे.

अमृतपाल सिंगच्या अटकेसाठी पंजाब पोलीस छापेमारी करीत असून त्यांच्या अनेक समर्थकांना ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यापैकी ५ जणांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाण्यात पाप करणाऱ्यांना शिक्षा देणार का? बीडच्या आमदारांनी गुलाबरावांना घेरलं

अमेरिकेतील भारतीय वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्यामुळे भारतीय अमेरिकन समुदायातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लोकांनी निदर्शने करून आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सॅन फ्रान्सिस्कोमधील हल्ल्यानंतर भारतीय अमेरिकन संस्था असलेल्या फाउंडेशन फॉर इंडिया आणि इंडियन डायस्पोरा स्टडीजने या प्रकरणावर टीका केली आहे. लंडन आणि सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय आस्थापनांवर होणारे हल्ले रोखण्यात यंत्रणेला अपयश आल्याने आम्ही दु:खी असून दोन्ही ठिकाणी कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असल्याचं संघटनेच्यावतीने सांगण्यात आलं आहे.

BJP Pune : जगदीश मुळीक खासदारकी लढवणार की आमदारकी?

काही कट्टरपंथी लोकांनी भारताच्या राजनैतिक मिशनवर कसा हल्ला केला. सोमवारी झालेल्या या हल्ल्यात खलिस्तानी समर्थक घोषणा देत आत घुसले आणि वाणिज्य दूतावासाबाहेरील बॅरिकेडिंग तोडले.

या ठिकाणा लोकांनी दोन खलिस्तानी झेंडेही लावले आहेत. नंतर वाणिज्य दूतावासात तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने हटवले. यानंतर आणखी काही लोक घुसले आणि त्यांनी वाणिज्य दूतावासाच्या दरवाजा आणि खिडक्यांवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यास सुरुवात केली.

धमक्या अन् दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही, थोरातांचा विखेंना अल्टिमेटम

दरम्यान, आत्तापर्यंत सॅन फ्रान्सिस्को पोलिसांकडून या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. भारतीय अमेरिकन समुदायाचे नेते अंजय भुटोरिया यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ही हिंसक घटना भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंधांसाठी चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले आहेत. याशिवाय भारतीय अमेरिकन समुदायाच्या सौहार्द आणि शांततेवरही हा हल्ला आहे.

हल्लेखोरांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे आवाहन भुटोरिया यांनी स्थानिक प्रशासनाला केले आहे. मी अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय समुदायातील लोकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन करत असून पंजाबमध्ये अमृतपाल सिंगला अटक करण्यासाठी पोलीस कारवाई करत असल्याचं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube