A Perfect Murder मधून पहिल्यांदाच साकारणार रुपाली भोसले सस्पेन्स-थ्रिलर भूमिका

A Perfect Murder : मराठी रंगभूमीवर सध्या ज्या उत्कंठावर्धक आणि अंगावर काटा आणणाऱ्या थ्रिलर नाटकाची जोरदार चर्चा सुरू आहे, ते नाटक म्हणजेच

A Perfect Murder

A Perfect Murder

A Perfect Murder : मराठी रंगभूमीवर सध्या ज्या उत्कंठावर्धक आणि अंगावर काटा आणणाऱ्या थ्रिलर नाटकाची जोरदार चर्चा सुरू आहे, ते नाटक म्हणजेच ‘अ परफेक्ट मर्डर’! सर अल्फ्रेड हिचकॉक यांच्या अजरामर कलाकृतीवर आधारित असलेल्या या नाटकाने आपल्या पहिल्या प्रयोगापासूनच प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावले आहे. नीरज शिरवईकर यांचे खिळवून ठेवणारे लेखन व नेपथ्य आणि विजय केंकरे यांचे कसलेले दिग्दर्शन लाभलेल्या या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, या नाटकाची घोडदौड रंगभूमीवर अविरत सुरू आहे. नात्यांमधील गुंतागुंत, थरार, रहस्य आणि अनपेक्षित वळणांचा थरार अनुभवण्यासाठी रसिक प्रेक्षक नाट्यगृहांमध्ये गर्दी करत आहेत.

या गाजलेल्या नाटकाच्या टीममध्ये अनिकेत विश्वासराव, सतीश राजवाडे यांसारख्या तगड्या कलाकारांसोबतच आता अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले याही एका महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. बऱ्याचदा विनोदी आणि हलकीफुलकी नाटके किंवा मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या रुपाली भोसले या नाटकातून एका पूर्णपणे वेगळ्या आणि गंभीर भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

या भूमिकेविषयी आणि एकूणच या अनुभवाबद्दल सांगताना त्या म्हणतात की, मी यापूर्वी बऱ्याच विनोदी नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे; पण सस्पेन्स-थ्रिलर नाटक करण्याची माझी ही अगदी पहिलीच वेळ आहे. कोणतीही नवीन भूमिका स्वीकारताना मी जुन्या गोष्टींचे दडपण न घेता अगदी ‘कोरी पाटी’ घेऊन कामाला सुरुवात करते. आधी काय घडलं किंवा काय होतं यापेक्षा ‘आता या क्षणी मी प्रेक्षकांसमोर काय सादर करणार आहे’ यालाच मी प्राधान्य देते.

पुढे बोलताना त्या विजय केंकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त करून म्हणतात की, विजय सर आणि इतर सर्वच सहकलाकारांसोबत काम करताना एक वेगळीच मजा येत आहे. विजय सरांचा रंगभूमीवरचा अनुभव इतका दांडगा आहे की, त्यांच्यासोबत काम करताना सतत नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. संपूर्ण टीमची एक छान केमिस्ट्री आणि भट्टी जमून आली आहे. सहकलाकारांसोबत काम करताना निर्माण होणारी उर्जा आणि एकत्रित सादरीकरणातून आकाराला येणारे नवे पैलू यामुळे हा अनुभव अधिक आनंददायी ठरत आहे.

उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर गोळीबार अन् सत्तूरने वार; तपासासाठी पोलिसांची 7 पथके रवाना

बदाम राजा प्रोडक्शन निर्मित, नीरज शिरवईकर यांचे लेखन व नेपथ्य आणि विजय केंकरे यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या नाटकाचे निर्माते माधुरी गवांदे व निनाद कर्पे हे आहेत. रंगभूमीवर यशस्वीरित्या सुरू असलेल्या या दर्जेदार कलाकृतीचा आणि सस्पेन्स थ्रिलरचा जिवंत अनुभव घेण्यासाठी नाट्यप्रेमींनी आवर्जून या नाटकाला पसंती द्यावी.

Exit mobile version