उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर गोळीबार अन् सत्तूरने वार; तपासासाठी पोलिसांची 7 पथके रवाना

Businessman Rana Suryavanshi : बारामतीमध्ये उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Businessman Rana Suryavanshi

Businessman Rana Suryavanshi : बारामतीमध्ये उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. गोळीबार करून धारदार शस्त्राने वार करणाऱ्या दोन अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सहा ते सात विशेष पथके तयार केली आहेत. या पथकांमध्ये १० ते १५ अधिकारी आणि ५० ते ६० पोलीस कर्मचारी सहभागी असून, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपींचा माग काढला जात आहे. दरम्यान, या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी या प्रकरणातील तपास आणि पोलिसांच्या कारवाईची माहिती दिली आहे.

बारामती (Baramati) तालुक्यातील गोजुबावी परिसरात काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उद्योगपती राणा सूर्यवंशी (Businessman Rana Suryavanshi) यांच्यावर हल्ला करण्यात आला. वैयक्तिक कामासाठी आलेल्या सूर्यवंशी यांच्याजवळ स्कूटीवरून दोन अज्ञात व्यक्ती आल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला, तसेच सत्तूरसारख्या धारदार शस्त्राने त्यांच्या उजव्या हातावर वार केला. या घटनेनंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि एक सत्तूर जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

शेअर बाजारात 4 लाख कोटी रुपयांचे नुकसान; आज शेअर बाजार का कोसळला? –

विशेष म्हणजे, राणा सूर्यवंशी यांना राज्य शासनाकडून पोलीस संरक्षण देण्यात आले होते. घटनेच्या वेळी संरक्षणासाठी एक पोलीस वाहन त्यांच्या सोबत होते, तर काही वाहने मागील अंतरावर होती. हल्ल्यानंतर आरोपींनी पालखी महामार्गाच्या दिशेने पलायन केल्याची माहिती फिर्यादीकडून पोलिसांना मिळाली आहे. या गंभीर घटनेचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबी आणि बारामती उपविभागातील पोलिसांची पथके सक्रिय झाली आहेत. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेण्यावर पोलिसांचा भर आहे.

follow us