Ruturaj Gaikwad ने शेअर केला भावी पत्नीचा फोटो : काही मिनिटात सायली संजीवची कमेंट, म्हणाली…

Rituraj Gaikwad: आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्यामुळे अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev ) चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. सायलीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काल आयपीएलच्या (IPL) १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) विजेतेपद मिळवला आहे.   View this post on Instagram   […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 30T135245.270

Ruturaj Gaikwad

Rituraj Gaikwad: आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्यामुळे अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev ) चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. सायलीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काल आयपीएलच्या (IPL) १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) विजेतेपद मिळवला आहे.


चेन्नईला शेवटच्या षटकात २ चेंडूंवर १० धावांची आवश्यकता असताना चेन्नईचा स्टार फलंदाज रविंद्र जडेजाने चौकार आणि षटकार ठोकला आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२३ चा किताब जिंकण्यामध्ये यशस्वी ठरला आहे. रविंद्र जडेजाच्या धडाकेबाज फलंदाजीचे सर्वत्र कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या (Rituraj Gaikwad) होणाऱ्या बायकोसोबतच तो खास फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

त्यावर आता अभिनेत्री सायली संजीवने देखील कमेंट केली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनी म्हणजेच चाहत्यांचा लाडका थाला बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये एका बाजूला ऋतुराज, तर मध्यभागी धोनी आणि बाजूला त्याची होणारी बायको उत्कर्षा बसली असल्याचे फोटो पोस्ट करण्यात आले आहे. “माझ्या आयुष्यातील दोन व्हीव्हीआयपी. यासाठी मी देवाचा खरंच आभारी आहे”, असे कॅप्शन ऋतुराजने या फोटोला दिले आहे. ऋतुराजची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टवर मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने देखील कमेंट केली आहे.

‘मुस्लिमांचा द्वेष ही एक फॅशन बनली, सरकारकडून….’; नसीरुद्दीन शाह यांचे मोठे विधान

सायली संजीवने ऋतुराजला आणि उत्कर्षाला शुभेच्छा दिल्या आहेत. “तुम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा”, अशी कमेंट सायली संजीवने केली आहे. याबरोबरच तिने उत्कर्षा आणि ऋतुराज या दोघांना टॅग केले आहे. ऋतुराजने पहिल्यांदाच उत्कर्षासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ते दोघेही जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

मात्र अद्याप याविषयी ऋतुराजने अधिकृत माहिती दिली नाही. दरम्यान ऋतुराजने हा फोटो पोस्ट केल्यावर अनेक क्रिकेटपटूंबरोबरच त्याच्या चाहत्यांनी देखील त्याला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी ऋतुराजला त्याच्या लग्नाअगोदरच त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version