S. S. Rajamouli : एस. एस. राजामौली दिग्दर्शित आगामी भव्य अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपट ‘वाराणसी’ ज्यात महेश बाबू, प्रियंका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. भारतीय सिनेमातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. रामोजी फिल्म सिटी येथे आयोजित भव्य ग्लोब ट्रॉटर इव्हेंटमध्ये चित्रपटाची पहिली झलक सादर करण्यात आली आणि तेव्हापासून उत्साहाला अधिकच उधाण आले.
या ग्रँड रिव्हीलसाठी 50, 000 हून अधिक चाहत्यांची गर्दी जमली होती. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ भारतीय मनोरंजन इतिहासातील सर्वात मोठ्या लाईव्ह फॅन गॅदरिंगपैकी एकच नव्हे, तर देशातील आजवरची सर्वात मोठी फिल्म रिव्हील ठरली. भारताबाहेरही ‘वाराणसी’ने आपली ठसठशीत उपस्थिती नोंदवायला सुरुवात केली आहे.
पॅरिसमधील ले ग्रँड रेक्स (Le Grand Rex) युरोपमधील (Europe) सर्वात मोठे आणि ऐतिहासिक थिएटर येथे आयोजित ट्रेलर फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाचा पहिला ग्लिम्प्स दाखवण्यात आला. स्क्रीनवर फुटेज सुरू होताच संपूर्ण थिएटर टाळ्यांच्या कडकडाटाने, शिट्ट्यांनी आणि उत्स्फूर्त जल्लोषाने दुमदुमून गेले, आणि वातावरण पूर्णपणे उत्साहाने भरून गेले. यानंतर प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रियांतून चित्रपटाची भव्य संकल्पना आणि नेत्रदीपक व्हिज्युअल्सचे मनापासून कौतुक केले.
फ्रान्समध्येही ‘वाराणसी’ (Varanasi) प्रदर्शित व्हावा, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. चित्रपटाचे संगीत विशेषतः प्रेक्षकांना भावले. भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा कथेत प्रभावीपणे गुंफल्याबद्दल अनेकांनी एस. एस. राजामौली यांचे कौतुक केले, तर काहींनी तर त्यांना आजच्या काळातील शेक्सपियर असेही संबोधले.
या खास क्षणांचे कॅमेऱ्यातील क्षण टिपत मेकर्सनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, “पॅरिसमधील ऐतिहासिक आणि युरोपमधील सर्वात मोठ्या थिएटर ले ग्रँड रेक्स येथे झालेल्या ट्रेलर फेस्टिव्हलमध्ये ‘वाराणसी’ जगासमोर सादर करण्यात आली. या फेस्टिव्हलमध्ये हॉलीवूड आणि फ्रेंच चित्रपटांचे 30 हून अधिक आगामी ट्रेलर्सही दाखवण्यात आले.
सुशांत शेलार घेऊन येत आहेत एस.एस.सी.बी.सी.एल; दुबईत रंगणार मराठी कलाकारांची क्रिकेट लीग
फ्रान्स, तुम्ही खरंच प्रेम आहात खरंच. #Varanasi #GrandRex @LeGrandRex” याशिवाय ‘वाराणसी’मधील पृथ्वीराज सुकुमारन यांचा कुंभा अवतारातील पहिला लूक आणि प्रियंका चोप्रा जोनस यांचा मंदाकिनी अवतार आधीच समोर आला असून, सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे देशभरातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता प्रेक्षक 2027 मध्ये हा भव्य चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
