Download App

Kon Honar Karodpati: सचिन पिळगावकरांनी ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांना देखील टाकलं मागे

Kon Honar Karodpati: सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Karodpati) या कार्यक्रमाचे नवं पर्व नुकतच सुरु झाले आहे. करोडपती होण्याचा हा खेळ चांगलाच रंगताना दिसत आहे. यातच या कार्यक्रमात खास बाप लेकीच्या जोडीने हजेरी लावली आहे. यावेळी अभिनेते सचिन पिळगावकर (Actor Sachin Pilgaonkar) आणि मुलगी श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgaonkar) यांची उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी बाप लेकीने दोघांच्या नात्यातील अनेक किस्से शेयर केले आहेत.


अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, गायक अशा वैविध्यपूर्ण काम केलेले सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या कारकिर्दीबद्दलही बऱ्याच गोष्टी शेयर केल्या आहेत. सचिन पिळगावकर यांच्या करियरची 60 वर्षे पूर्ण होत आहेत. असं म्हणतात की सचिन पिळगावकर हे अमिताभ बच्चन यांना देखील सिनियर आहेत. हाच प्रश्न सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांनी पिळगावकरांना विचारला.

यावर सचिन पिळगावकर यांनी उत्तर दिलं की, “माझ्यावर परमेश्वराची कृपा आहे. सिनियॉरिटी आहे ती महत्त्वाची असते, पण त्याचबरोबर तुम्ही काम काय करता, तुम्ही ती किती वर्षात करता हे महत्त्वाचं नाही काम महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. पण हे फक्त मला नाही तर अमितजींना सुद्धा वाटतं.

सचिन खेडेकर यांनी सचिन पिळगावकर यांना त्यांच्या कारकिर्दीविषयी विचारताना त्यांना किती सिनेविश्वात किती वर्षे पूर्ण झाली, असं विचारताच सचिन पिळगावकरही सांगतात की, “हे साठावं वर्ष आहे माझ्या करियरचं.” शिवाय सचिन यांनी मुलगी श्रियासाठी केलेली खास गोष्ट यावेळी सांगितली.

Marriage : अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात

सचिन पिळगावकर यांनी पहिल्यांदा किचनमध्ये पाऊल ठेवलं ते त्यांच्या मुलीसाठी. यावेळी ते सांगतात की, “मी पहिल्यांदा किचनमध्ये गेलो ते माझ्या मुलीकरता. चिकन धुतलं त्याचे पिसेस केलं आणि मस्तपैकी चिकन इन हनी तयार केलं होतं.” कोण होणार करोडपतीचा खेळ तर या बाप- लेकीच्या जोडीने खेळला. शिवाय या जोडीची धमाल या मंचावर पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात ही धमाल पाहायला मिळणार आहे. एवढच नाही तर सचिन पिळगावकर आणि मुलगी श्रिया या दोघांनी सुंदर गाणही या मंचावर गायले आहे. तेव्हा हा विशेष भाग पाहणं मह्त्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us