Sachin Pilgaonkar : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणारे अभिनेते म्हणजे सचिन पिळगावकर (Pilgaonkar) हे चित्रपटांमुळे तसंच, त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. सचिन पिळगावकर हे नेहमी त्यांच्या चित्रपटांच्या तसंच, त्यांच्या अनुभवाबद्दल सांगताना दिसतात. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत.
सचिन पिळगावकर यांच्या आयुष्यातील एक गोष्ट नक्कीच फार कमी लोकांना माहित असेल की सचिन आणि सुप्रिया यांनी श्रियाच्या जन्माआधी एका मुलीला दत्तक घेतलं होतं. कारण श्रिया लहान असताना अशा बऱ्याच अफवा येत होत्या की ती त्यांची दत्तक मुलगी आहे. यावर खुलासा करत सचिन पिळगावकरांनी हे स्पष्ट केलं आहे. श्रिया ही त्यांची खरी मुलगी असून त्यांची दत्तक मुलगी दुसरी आहे. पण या मुलीने मोठं झाल्यावर त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याचंही म्हटलं जातं.
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रियाला सगळेचजण ओळखतात. पण श्रियाच्या जन्मापूर्वी सुप्रिया आणि सचिन यांनी करिष्मा मखनी नावाच्या मुलीला त्यांनी दत्तक घेतलं होतं. या मुलीचे वडील सचिन यांचे चांगले मित्र होते. दरम्यान, सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या ‘हाच माझा मार्ग एकला’ या पुस्तकात या घटनेचा उल्लेखही केला आहे. याविषयी त्यांनी एका मुलाखतीतही भाष्य केलं होतं. करिष्मा ही अतिशय श्रीमंत घरातील मुलगी. ती लहान असताना तिची आई खूप आजारी होती. त्यामुळे तिचे वडील रेस्टॉरंटमध्येच तिला घेऊन राहायचे.
सचिन पिळगावकर पुन्हा ट्रोल; म्हणाले चौदाव्या वर्षी संजीव कुमारला दिला होता ऑटोग्राफ
अशाच एका भेटीत सचिन-सुप्रिया यांना करिष्मा म्हणजे किट्टूविषयी समजलं आणि त्यांनी तिला घरी आणण्याचा निर्णय घेतला. सुप्रिया यांनी मनापासून किट्टूचा सांभाळ केला. त्यावेळी ती तीन-चार वर्षांची होती. सचिन आणि किट्टूच्या वडिलांनी एकत्र येऊन किट्टू फिल्म्स ही चित्रपट कंपनी देखील स्थापन केली होती. पण नंतर त्यांच्यात काही गैरसमज झाले आणि त्यांनी ही कंपनी बंद केली. किट्टूचे वडील येऊन तिला लंडनला घेऊन गेले. सचिन आणि सुप्रिया यांनी तिला कायदेशीर रित्या दत्तक घेतलं नव्हतं. पण ते तिला मुलगी माणून तिचे त्यांनी उत्तम पालनपोषण केलं होतं.
इतकाच नाही तर सिनेमातही तिला भूमिका दिल्या होत्या. मात्र, करिष्माच्या वडिलांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता तिला परत घेऊन गेल्यामुळे पिळगावकर कुटूंबाला या गोष्टीचा धक्का बसला होता. सचिन यांनी किडनॅपिंगचे आरोपही केले होते. पण हे आरोप त्या कुटूंबाने फेटाळून लावले. करिष्मा लंडनवरून परत मुंबईत अभिनय करण्यासाठी आली होती. तेव्हा तिने सचिन आणि सुप्रिया यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी तिला पुन्हा स्वीकारलंही. त्यानंतरही ती सहा-सात महिने त्यांच्याकडे राहिली. पण या दरम्यान तिने अभिनयाचे क्लासेस बुडवणे, दिलेले सल्ले न ऐकणे अशा गोष्टी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिचा इंडस्ट्रीत टिकाव लागला नाही.
अखेर ती पुन्हा लंडनला परत गेली. त्यानंतर तिने आणि तिच्या बाबानी मिळून एक पत्रकार परिषद घेतली. यात तिने सचिन आणि सुप्रिया यांच्यावर गंभीर आरोपही केले. सचिन यांनी सांगितल्या प्रमाणे किट्टूमुळे काहीजणांमध्ये श्रिया ही सचिन-सुप्रिया यांची दत्तक मुलगी असल्याचा गैरसमजही निर्माण झाला होता. आणि तो बराच काळ तसाच टिकून होता. त्यामुळे श्रियाला ती त्यांची सख्खी मुलगी असल्याचं आजही अनेकांना सांगावं लागतं. हा गैरसमज अजूनही लोकांच्या मनात आहे.