Sachin Pilgaonkar Presented Sthal Movie Will Released On 7 March : अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये अभिनय, (Marathi Movie) चित्रपटांचे दिग्दर्शन, गायन अशी पाच दशकांपेक्षा अधिक मोठी, बहुरंगी कारकिर्द गाजवणारे सचिन पिळगांवकर आता नव्या वर्षात नवी इनिंग सुरू करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या धुन प्रॉडक्शन निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित ‘स्थळ’ या बहुचर्चित चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) करणार आहेत. महिला दिनाच्या औचित्याने 7 मार्चला ‘स्थळ’ हा चित्रपट (Sthal Movie) प्रदर्शित होणार आहे.
ठाकरेंच्या कौतुकानं फुलणार नवी पालवी?;’सामना’तील प्रत्येक ओळीत दडलायं ‘घट्ट मैत्रीचा’ अर्थ!
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘स्थळ’ चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलंय. शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा आणि जयंत दिगंबर सोमलकर यांनी “स्थळ” या चित्रपटाची निर्मिती केली (Entertainment News) आहे. नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग ढवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
दिग्दर्शक जयंत दिगंबर सोमलकर यांनी शॉर्ट फिल्म्ससह ‘गिल्टी माईंड्स’ या गाजलेल्या वेब सीरिजचं सहदिग्दर्शन केलं होतं. ‘स्थळ’ हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला. तिथे त्याला सर्वश्रेष्ठ आशिया पॅसिफिक फिल्मसाठी NETPAC अवॉर्ड सुद्धा मिळाला. त्यानंतर तब्बल 29 महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला आहे. 16 पेक्षा जास्त पुरस्कारही पटकावले आहेत. त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.
“पुढील तीन महिन्यात सरकार पडणार म्हणजे पडणार”, शरद पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा
सर्वप्रथम श्रियाने मामी फेस्टिवलमध्ये हा चित्रपट पाहिला होता. ख़ास श्रियाच्या आग्रहास्तव अमेरिकेत ‘नाफा’ फिल्म फेस्टिवलमध्ये मी आणि सुप्रियाने ‘स्थळ’ हा चित्रपट पाहिला. त्यावेळीच हा चित्रपट आम्हा दोघांनाही प्रचंड आवडला होता. महाराष्ट्रातील मातीत रूजलेल्या या चित्रपटाला अमेरिकेच्या मराठी लोकांनी डोक्यावर घेतलेले पाहून, चित्रपट प्रदर्शित करताना काही मदत लागल्यास आवर्जून सांगा असे निर्माता, दिग्दर्शक जयंत सोमलकर यांना आम्ही सांगितले. ‘स्थळ’ चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी मला चित्रपटाची प्रस्तुती करण्यास विचारले आणि मी लगेच होकर दिला. चांगली संहिता ही रसिक प्रेक्षकांपर्यंत अवश्य पोहचली पाहिजे. यासाठी मी या चित्रपटाची प्रस्तुती करण्याचे ठरविले, असं चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर यांनी सांगितलं आहे.