Download App

सचिन पिळगावकर पुन्हा ट्रोल; म्हणाले चौदाव्या वर्षी संजीव कुमारला दिला होता ऑटोग्राफ

Sachin Pilgoankar यांनी सांगितलेल्या किस्स्यांवरून बऱ्याचदा नेटकरी त्यांना ट्रोलही करतात. आताही असंच काहीसं घडलं आहे.

Sachin Pilgoankar got trolled again he said sanjeev kumar took his autograph at age of 14 : सचिन पिळगावकर मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला ‘अशी ही बनवाबनवी’ ,‘आमच्यासारखे आम्ही’, ‘नवरा माझा नवसाचा’ सारखे चित्रपट दिले आहेत. सोशल मीडियावरही ते नेहमी चर्चेत असतात आणि त्यांचे व्हिडीओ नेहमीचं व्हायरल होत असतात. याचं कारण आहे सचिन पिळगावकर यांनी सांगितलेले किस्से. बऱ्याचदा नेटकरी त्यांना या किश्श्यांवरून ट्रोलही करतात. आताही असंच काहीसं घडलं आहे.

झोपेचा अभाव आरोग्यासाठीच नाही तर नातेसंबंधांसाठीही हानिकारक! ‘इतक्या’ तासांची झोप आवश्यकच

रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पिळगावकरांनी 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हा माझा मार्ग एकला’ या सिनेमाच्या संबंधित एक किस्सा सांगितला आहे. या सिनेमात त्यांनी बालकलाकारची भूमिका साकारलेली. तेव्हा ते फक्त अवघ्या सात वर्षांचे होते.

मोबाईल असोसिएशनने राज्यात सर्वात मोठी रक्तदानाची लोक चळवळ उभी केली : आमदार संग्राम जगताप

…आणि संजीव कुमार यांनी मागितला ऑटोग्राफ

रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर म्हणाले, “एकदा घराची बेल वाजली. माझ्या वडिलांनी दरवाजा उघडला आणि समोर संजीव कुमार उभे होते. बाबांनी त्यांचं स्वागत केलं. मग त्यांनी विचारलं, ‘सचिन आहे का? त्याला बोलवा’. मी आलो. ते मला म्हणाले, ‘मी आताच हा तुझा ‘माझा मार्ग एकला’ सिनेमा पाहून आलो आहे. मी आयुष्यात कधी कोणाचाही ऑटोग्राफ घेतलेला नाही. आज पहिल्यांदाच घेणार आहे. तू मला ऑटोग्राफ देशील का?’ त्यांनी माझ्यासमोर ऑटोग्राफ बुक आणि पेन ठेवलं. मी लिहिलं, ‘माय डिअर हरि भाई, विथ लव्ह सचिन.”

त्यांच्या डोक्यावर बंदूक पण खाजगीत विचारलं तर… शक्तिपीठ महामार्गावरून सतेज पाटीलांचा टोला

नेटकऱ्यांनी केलं प्रचंड ट्रोल

सचिन पिळगावकर यांचा मुलाखतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी त्यांच्या या किश्श्यासाठी त्यांना प्रचंड ट्रोल केलं आहे. एका नेटकाऱ्याने सचिन कमेंट करत लिहिलं की, ‘आता हे नवीन प्रकरण’, पुढील कमेंटमध्ये म्हटलंय की ‘ऐ डिकरा…..काय पण बोलते…. काय पण फेकते…. ‘ , ‘तुमचे चित्रपट एवढ़े कॉमेडी नव्हते तेवढी कॉमेडी तुम्ही आता करत आहे’ अशा शब्दांत कमेंट्स करत सचिन यांना ट्रोल केलं जातंय.

follow us