त्यांच्या डोक्यावर बंदूक पण खाजगीत विचारलं तर… शक्तिपीठ महामार्गावरून सतेज पाटीलांचा टोला

त्यांच्या डोक्यावर बंदूक पण खाजगीत विचारलं तर… शक्तिपीठ महामार्गावरून सतेज पाटीलांचा टोला

Satej Patil Criticize Rajesh Kshirsagar and Shivaji Patil on Shaktipith Highway : कोल्हापूरमध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले होते. त्यावेळी कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी सरकारवर आणि विशेषत: भाजप-शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली. तसेच यावेळी माध्यामांच्या विविध प्रश्नांना सतेज पाटलांनी उत्तरं दिली. त्यात त्यानी गोकुळ दूध संघ, केडीसीसी कॉंग्रेस नेते राहुल पाटील यांच्याबाबत देखील टीप्पणी केली आहे.

लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी; विरोधी पक्षनेते राहुल गांधीचा गंभीर आरोप

नेमकं काय म्हणाले सतेज पाटील?

यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले की, जर शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांच्या विरोध नाही, तर एवढे आक्षेप का येत आहेत?त्याचबरोबर भाजप आणि शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर आणि शिवाजी पाटील यांच्या डोक्यावर बंदूक आहे. त्यामुळे ते आंदोलनाला पाठिंबा देऊ शकत नाही. असं त्यांना खाजगीत विचारलं तर ते सांगतील की, शक्तिपीठ महामार्गाची गरज आहे की नाही? मात्र वरिष्ठांकडून आलेला आदेश पाळणेश्वर त्यांच्याकडे पर्याय नाही. त्यामुळे त्यांनी माहिती घ्यावी शेतकऱ्यांना किती मोबदला मिळणार? हे पाहणं देखील गरजेचं आहे.

Tata Capital IPO ‘या’ दिवशी येणार, गुंतवणूकदारांना होणार बंपर फायदा; जाणून घ्या सर्वकाही

दुसरीकडे गोकुळची उलाढाल 4 हजार कोटींवर गेलीय. केडीसीसीने संचालक वाढीचा निर्णय घेतल्याने ही व्याप्ती झाली आहे. पण महायुतीतील तूतू मैमैचा परिणाम यावर होत आहे. दरम्यान यावेळी कॉंग्रेस नेते राहुल पाटलांच्या कॉंग्रेस सोडण्याच्या चर्चावर सतेज पाटील म्हणाले की, पी एन पाटलांची हयात कॉंग्रेसमध्ये गेली. करवीर मतदारसंघात कॉंग्रेसची मोठी ताकद आहे. ते आणि त्यांचे बंधू मला भेटणार आहेत. त्यामुळे ते असा निर्णय घेतील असं वाटत नाही. असं देखील यावेळी पाटील म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube