Tata Capital IPO ‘या’ दिवशी येणार, गुंतवणूकदारांना होणार बंपर फायदा; जाणून घ्या सर्वकाही

Tata Capital IPO ‘या’ दिवशी येणार, गुंतवणूकदारांना होणार बंपर फायदा; जाणून घ्या सर्वकाही

Tata Capital IPO : भारतीय शेअर बाजारातून आज गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, लवकरच टाटा कॅपिटल आयपीओ आणणार आहे. काही दिवसांपूर्वी टाटा ग्रुपने टाटा टेक्नॉलॉजीचा (Tata Technology) पब्लिक इश्यू आणला होता. ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला होता. तर आता माहितीनुसार, कंपनी टाटा कॅपिटलचा आयपीओ (Tata Capital IPO) आणणार आहे.

टाटा कॅपिटलने त्यांच्या प्रस्तावित पब्लिक इश्यूसाठी ड्राफ्ट पेपर्स सादर केले आहे. यानंतर आज भारतीय शेअर बाजारात टाट इन्व्हेस्टमेंट कॉपोरेशनचे शेअर्समध्ये 6 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. एका वृत्तानुसार, टाटा सन्स टाटा कॅपिटलच्या आयपीओमध्ये 23 कोटी शेअर्स विकणार आहे. तर इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन 3.58 कोटी शेअर्स विकणार आहे. याच बरोबर कंपनी तब्बल 21 कोटी किमतीचे नवीन शेअर्स देखील आणणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सप्टेंबरमध्ये होणार लॉन्च ?

माहितीनुसार, देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयच्या (RBI) गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीकडून आयपीओ लॉन्च करण्यात येत आहे. ज्यामध्ये आरबीआयने ‘अपर लेयर’ म्हणून वर्गीकृत केलेल्या सर्व एनबीएफसींना सप्टेंबरपर्यंत लिस्टिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. टाट कॅपिटल लिमिटेड या आयपीओच्या मदतीने 13, 370 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न आहे. कंपनीने या वर्षी मार्चमध्ये राइट्स इश्यू पूर्ण केला होता, त्या आयपीओची किंमत प्रति शेअर 281 रुपये असू शकते.

‘सत्यभामा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित; 8 ऑगस्ट रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 

टाटा कॅपिटलची आर्थिक कामगिरी

टाटा कॅपिटलने मार्च 2025 च्या तिमाहीत कंपनीने 1000 कोटी रुपयांचा नफा कमावला. त्याच तिमाहीत कामकाजातून मिळणारा महसूल जवळपास 50 टक्क्यांनी वाढून 7,478 कोटी रुपये झाला, जो गेल्या वर्षी याच कालावधीत 4,998 कोटी रुपये होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube