Saif Ali Khan : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सैफ अली खानवर चाकू (Saif Ali Khan) हल्ला झाला. चोख सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असतानाही अज्ञात मारेकरी त्याच्या घरात घुसला आणि सैफवर सपासप वार केले. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. सैफवर हल्ला का झाला, नेमकं कारण काय, काय घडलं होतं असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. दरम्यान, या प्रकरणात आता मुंबई पोलिसांचे अधिकृत वक्तव्य समोर आले आहे. तसेच सैफच्या पीआरचेही वक्तव्य रिलीज करण्यात आले आहे. या हल्ल्यात आतापर्यंत काय काय खुलासे झाले आहेत याची माहिती घेऊ या..
सहा वार अन् पाठीला दुखापत, सैफवर होणार प्लास्टिक सर्जरी; हेल्थ बुलेटिन जारी
मुंबई पोलिसांनुसार, रात्रीच्या वेळी एक अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला. सर्वात आधी त्याचे घरातील मोलकरणीशी वाद झाले. वाद सुरू असल्याचे लक्षात येताच सैफ तिथे आला. त्याने दोघांच्या वादात मध्यस्थी करून त्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण, तो व्यक्ती सैफवरच भडकला. रागाच्या भरात त्याने हातातील धारदार शस्त्राने सैफवर सपासप वार केले. यावेळी दोघांत झटापट झाली.
सैफ अली खानच्या पीआर टीमनेही या घटनेबाबत एक निवेदन दिलं आहे. यानुसार सैफच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिडिया आणि चाहत्यांनी संयम बाळगावा. हा प्रकार पोलीस केस आहे. आम्ही आपलेल्या प्रत्येक घडामोडीची माहिती देत राहू असे पीआर टीमने म्हटले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात सैफला सहा ठिकाणी जखमा झाल्या आहेत. मान आणि पाठीच्या कण्याजवळही जखम झाली आहे. घरातील मोलकरीणही या हल्ल्यात जखमी झाली आहे. परंतु, सैफच्या तुलनेत तिला गंभीर दुखापत झालेली नाही.
Siddharth-Saif: सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान 17 वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार
घटना घडली तेव्हा सैफचे सर्व कुटुंब घरातच होते. करिना आणि दोन मुलेही घरातच होती. आपल्या कुटुंबियांना वाचविण्यासाठी सैफ थेट हल्लेखोराला भिडला असेही आता सांगण्यात येत आहे. हा हल्ला का झाला? यामागचं कारण काय? हल्लेखोर घरात कसा घुसला याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. हल्लेखोर बाहेरील कुणी होता की इमारतीच्या परिसरात आधीपासूनच काम करणारे होते याचा तपास केला जात आहे. कारण, चौकीदाराने कुणालाही घरात शिरताना पाहिलं नव्हतं अशी माहिती तपासात समोर आली आहे. सैफच्या घरात एक पाइपलाइन आहे. ही पाइपलाइन थेट बेडरुमपर्यंत येते. याच पाइपलाइनच्या मदतीने हल्लेखोर घरात घुसला असावा असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात वाटत आहे.