Siddharth-Saif: सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान 17 वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार

Siddharth-Saif: सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान 17 वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार

Siddharth-Saif: दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) ‘पठाण’ चित्रपटातून शाहरूख खानने बॉक्स ऑफिसवर दमदार कमबॅक केलं. या चित्रपटाने 600 कोटींहून अधिक कमाई केली होती. या सुपरहिट चित्रपटानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खा (Saif Ali Khan) तब्ब्ल 17 वर्षानंतर एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. अलीकडेच सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान हे एकत्र दिसले होते. त्यामुळं ही जोडी पुन्हा एकत्र काम करणार असल्याचे वृत्त आहे.

Bhiwandi Loksabha 2024 : महाविकास आघाडीत बंडाचे वारे; भिवंडीत राष्ट्रवादीविरोधात काँग्रेस नेत्यांनी ठोकला शड्डू 

मार्फ्लिक्स पिक्चर्सच्या बाहेर पापाराझींनी सिध्दार्थ आणि सैफला एकत्र स्पॉट केलं आहे. आता सगळ्यांना या जोडीच्या Reunion ची उत्सुकता आहे. दरम्यान, याआधी या दिग्दर्शक-अभिनेता जोडीने सलाम नमस्ते (2005) आणि ता रा रम पम (2007) मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांच्या शेवटच्या प्रोजेक्ट्स नंतर ते आता 17 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत. सिध्दार्थ आणि सैफने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नसली तरी ते एकत्र एका प्रोजेक्टसाठी काम करणार असल्याचा चर्चा आहेत. हे दोघे नेटफ्लिक्स स्ट्रीमिंगसाठी ॲक्शन थ्रिलर चित्रपटासाठी एकत्र येत आहेत.

श्रीकांत शिंदेंची उमेदवारी फडणवीसांनी का जाहीर केली? जाणून घ्या इनसाईड स्टोरी 

सूत्रानुसार सिद्धार्थ आनंद हे सैफ अली खान, जयदीप अहलावत, कुणाल कपूर आणि निकिता दत्ता अभिनीत ‘ज्वेल थीफ’ची निर्मिती करत आहे. सिध्दार्थ आनंद सोबत ममता आनंद देखील या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. तर रॉबी ग्रेवाल हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सध्या या हा चित्रपट निर्मितीच्या टप्प्यात असून मे महिन्यात याच आंतरराष्ट्रीय शूट होणार आहे. Marflix Pictures या त्यांच्या बॅनरखाली सिद्धार्थ आनंद आणि ममता आनंद यांनी निर्मित केलेला हा प्रकल्प आघाडीच्या OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube