‘सैयारा’ पुन्हा जिंकतोय मनं! फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये ठरला ‘पॉप्युलर चॉइस’

हा मान चित्रपटाचे निर्माते आणि वायआरएफ चेसीईओ अक्षय विधानी तसेच दिग्दर्शक मोहित सूरी यांनी मुंबईतील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात स्वीकारला.

News Photo   2025 11 14T174101.003

News Photo 2025 11 14T174101.003

सैयारा’ पुन्हा जिंकतोय मनं यशराज फिल्म्स आणि मोहित सूरी यांचा (Film) ऐतिहासिक ब्लॉकबस्टर येलोस्टोन इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये ठरला ‘पॉप्युलर चॉइस’ भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारी रोमँटिक फिल्म ठरलेला यश राज फिल्म्स चा ‘सैयारा’, येलोस्टोन इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये पॉप्युलर चॉइस अवॉर्ड जिंकत पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली आहेत.

हा मान चित्रपटाचे निर्माते आणि वायआरएफ चेसीईओ अक्षय विधानी तसेच दिग्दर्शक मोहित सूरी यांनी मुंबईतील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात स्वीकारला. जेन जी च्या नव्या चेहऱ्यांनी—अहान पांडे आणि अनीत पड्डा—यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलेल्या ‘सैयारा’ने भारतात आणि जगभरातील दक्षिण आशियाई तरुणांमध्ये एक भव्य पॉप-कल्चर क्षण निर्माण केला आहे. या ऐतिहासिक लॉन्च ची तुलना 25 वर्षांपूर्वी ‘कहो ना प्यार है’मधून झालेल्या हृतिक रोशन आणि अमीषा पटेल यांच्या पदार्पणाशी केली जात आहे.

YIFF 2025 मधील पॉप्युलर चॉइस अवॉर्ड—सीझनमधील पहिला पुरस्कार—सिद्ध करतो की ‘सैयारा’ने प्रेक्षकांशी असामान्य नाते बांधले आणि रोमँटिक चित्रपटांना पुन्हा एकदा थिएटरमध्ये परत आणले. ही कामगिरी ‘सैयारा’च्या वाढत्या वारशाला अधिक बळकटी देते—एक असा चित्रपट म्हणून, जो केवळ व्यावसायिक यशस्वीच ठरला नाही तर भावनिक पातळीवरही प्रेक्षकांना स्पर्श करून गेला.

‘गोंधळ’ची महाराष्ट्रात जोरदार चर्चा; पारंपरिक गोंधळाच्या स्वरात प्रेक्षकांचा जल्लोष

अवार्ड स्विकारताना वायआरएफ सीईओ अक्षय विधानी म्हणाले—“धन्यवाद येलोस्टोन इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल —हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे. ‘सैयारा’साठी हा पहिला अवॉर्ड असल्यामुळे खूप खास आहे। माझ्यासाठी ‘सैयारा’ म्हणजे मोहित आणि मोहित म्हणजे ‘सैयारा’. हा प्रवास 2024 मध्ये सुरू झाला आणि आज आपण इथे आहोत—ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला आणि संगीताला जगभरातून प्रचंड प्रेम दिले, तसेच आमच्या जेन जी स्टार्स—अहान आणि अनीत—यांना उचलून धरले. हा पुरस्कार संपूर्ण टीमचा आहे।”

दिग्दर्शक मोहित सूरी म्हणाले—“हे खूप खास आहे. मी 20 वर्षे इंडस्ट्रीत आहे आणि हा माझा पहिला अवॉर्ड आहे. या चित्रपटात अनेक गोष्टी प्रथमच घडल्या—कलाकार प्रथमच अभिनय करत होते, मी पहिल्यांदा वायआरएफ साठी फिल्म बनवत होतो आणि अक्षय पहिल्यांदा प्रोड्यूस करत होते. मला अजूनही आठवतं, लहानपणी मी थिएटरमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ पाहिली—तेव्हाच फिल्ममेकर होण्याची ठिणगी पडली। धन्यवाद आदि सर—जग प्रेमावर विश्वास ठेवत नसताना तुम्ही तो विश्वास ठेवला.”

ते पुढे म्हणाले—“जेव्हा मी स्क्रिप्ट दिली, तेव्हा ना अक्षयांनी ना आदि सरांनी कधी म्हटले की हिट फिल्म बनव. त्यांचा एकच ब्रीफ होता—‘तुझी सर्वोत्तम फिल्म आणि सर्वोत्तम संगीत दे.’ या स्वातंत्र्यामुळेच सर्वकाही शक्य झाले. 20 वर्षं लागली तरी, आपल्या कथेशी प्रामाणिक राहिलात तर यश आणि मान नक्कीच मिळतो.

‘सैयारा’ने अनेक विक्रम मोडले—

नवोदित कलाकारांच्या चित्रपटासाठी सर्वात मोठी ओपनिंग

टायटल ट्रॅक हा बिलबोर्ड Top 10 मध्ये पोहोचणारा पहिल हिंदी गाणं

रिलीज नंतर अनेक महिन्यांपर्यंत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर No.1

जगभरातून तब्बल ₹580 कोटी ग्रॉस कमावणारा एकमेव पदार्पण चित्रपट

Exit mobile version