सैयाराचा बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ! तिसऱ्या आठवड्यातही सुपरहिट, 290 कोटींच्या कमाईने नवा विक्रम…

सैयाराचा बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ!  तिसऱ्या आठवड्यातही सुपरहिट, 290 कोटींच्या कमाईने नवा विक्रम…

Saiyaara Box Office Collection : Yash Raj Films (YRF) आणि दिग्दर्शक मोहित सुरी यांची ब्लॉकबस्टर प्रेमकहाणी सैयारा (Saiyaara) बॉक्स ऑफिसवर अजूनही तुफान गतीने धावत आहे. चित्रपटाने (Bollywwod News) आपल्या तिसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारच्या दिवशीच 5 कोटींची कमाई करत पुन्हा एकदा सिद्ध केलं की, प्रेक्षकांचं प्रेम या सिनेमावर (Entertainment News) अजूनही तसंच आहे.

एकूण गल्ला 290.25 कोटींवर

या चित्रपटाने आतापर्यंत भारतात एकूण 290.25 कोटींचा नेट बिझनेस करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही आकडेवारी सैयाराला भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या प्रेमकथांमध्ये अव्वल स्थानावर नेऊन ठेवते. ही कमाई पाहता, सैयारा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक ऐतिहासिक लव्हस्टोरी ठरली आहे.

धक्कादायक! डिजिटल अरेस्टच्या सायबर क्राइम रॅकेटमध्ये सापडली छत्रपती संभाजीनगरची दोन मुलं

नवोदित कलाकारांचं धडाकेबाज पदार्पण

YRF चे सीईओ अक्षय विधानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे, सैयारा हे भारतीय चित्रपटसृष्टीतलं सर्वात मोठं डेब्यू लॉन्च मानलं जात आहे. अभिनेता अहान पांडे आणि अभिनेत्री अनीत पड्ढा यांनी या चित्रपटातून पदार्पण करताच संपूर्ण देशाच्या ‘Gen Z’ चाहत्यांची मने जिंकली आहेत. हे दोघंही आता नव्या युगातील सुपरस्टार्स आणि नवे प्रेमीपुजे बनले आहेत.

तिसऱ्या आठवड्याची सुरुवात दमदार

चित्रपटाचा तिसऱ्या आठवड्यातील शुक्रवार (3rd Friday) चा बिझनेस खालीलप्रमाणे:
3रा शुक्रवार – ₹5.00 कोटी (नेट), या दमदार कमाईमुळे सायारा अजून किती दूरपर्यंत मजल मारतो, याकडे संपूर्ण इंडस्ट्रीचं लक्ष लागून आहे.

भाजपचं ‘गुजराती कार्ड’! ठाकरे बंधू एकत्र येताच, नव्या रणनीतीचा खेळ सुरू…

या सिनेमातून पदार्पण करणारे अहान पांडे आणि अनीत पड्ढा हे दोघंही आता तरुण वर्गाच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. दोघांची जोडी, त्यांचा अभिनय आणि आधुनिक तरुणाईच्या प्रेमभावनांना स्पर्श करणारी पटकथा, यामुळे सायारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात खोलवर रुतला आहे. यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांची ही निर्मिती केवळ यशस्वी नाही, तर ती एक सांस्कृतिक घटना ठरत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नवोदित कलाकारांसह आलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतकी जबरदस्त कमाई केली, हे एक वेगळंच उदाहरण ठरतं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube