Download App

Sakhi Gokhale पुन्हा एकदा झळकणार बॉलिवुडमध्ये; ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका

Sakhi Gokhale अभिनय, कला आणि अनेक गोष्टींची सांगड घालत काम करणारी अभिनेत्री, लेखिका म्हणून सखी गोखले कायम चर्चेत असते.

Sakhi Gokhale Once Again In Bollywood : अभिनय, कला आणि अनेक गोष्टींची सांगड घालत काम करणारी अभिनेत्री, लेखिका म्हणून सखी गोखले ( Sakhi Gokhale ) कायम चर्चेत असते. ” दिल दोस्ती दुनियादारी ” पासून सुरु झालेला सखीच्या अभिनयाचा प्रवास आता बॉलिवुडमध्ये ( Bollywood ) येऊन पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय फायर फायटर दिना निमित्त ” अग्नी ” चित्रपटाच पोस्टर आउट झाला आणि आता या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री सखी गोखले देखील दिसणार आहे.

“पाच वर्षांत साधं नाट्यगृह सुरू करता आलं नाही” कोल्हेंच्या आरोपांना उत्तरे देत अक्षय आढळरावांचा प्रहार

सखीने आजवर अनेक नाटकात, चित्रपटात, मालिकेत काम केलं आहे आणि आता सखी ” अग्नी ” मध्ये दिसणार आहे. 2024 मध्ये अनेक मराठी कलाकारांनी बॉलिवुड गाजवल आणि आता सखी देखील त्याचा एक भाग होणार आहे. अग्नी मध्ये सखीच्या सोबतीने अनेक बडे कलाकार दिसणार असून यात प्रतीक गांधी, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, देव्येंदू, सयामी खेर यांच्या सारखी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे.

>Jeena Sikha De: अरिजितच्या जादुई आवाजात सजलंय ‘जीना सिख दे’! ‘श्रीकांत’ मधील गाणं ऐकाच

अग्नी बद्दल बोलताना सखी म्हणते ” अग्नीच चित्रीकरण करण हा माझ्यासाठी खूप छान अनुभव होता अनेक बड्या कलाकारांच्या सोबतीने यात काम करता आला आणि हा निव्वळ योगायोग होता म्हणून सेटवर आपली जवळची लोकं असल्यासारखं वाटलं. अग्नी चे दिग्दर्शक राहुल ढोलाकिया यांच्या सारख्या उत्तम दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी या निमित्ताने मिळाली. हा अनुभव देखील सुंदर होता. अग्नी मध्ये माझं सगळ्यात जास्त काम हे देविंद्यू सोबत आहे. त्याचसोबत काम करण्याचा अनुभव भारी होता. एक को अॅक्टर म्हणून तो कमालीचा कलाकार आहे. प्रतीक गांधी, सई ताम्हणकर आणि जितू दादा यांच्या सोबत एकत्र येऊन काम करतानाचा अनुभव मी शब्दात मांडू शकत नाही. सगळ्यांच्या सोबतीने मीसुद्धा अग्नी साठी तितकीच उत्सुक आहे ”

सखी अभिनयाच्या सोबतीने एक अव्वल कलाकार देखील आहे. सखी अभिनेत्री तर आहेच पण ती उत्तम फोटोग्राफर देखील आहे. 2018 मध्ये तिने आर्ट क्युरेशन मध्ये मास्टर केलं असून अभिनयाच्या सोबतीने सखी स्वतःच्या आवड जपत अनेक काम करताना दिसतेय. आगामी काळात सखी अजून काय काय काम करणार हे बघण उत्सुकतेच असणार आहे.

follow us