Kisi Ka Bhai Kisi Ki Jan सलमानच्या नव्या गाण्याने वेधले लक्ष

मुंबई : सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ साठी मेहनत घेत आहे. हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. दरम्यान सलमान खान आपल्या चाहत्यांसाठी चित्रपटातील अपडेट्स शेअर करत असतो. आता त्याने या चित्रपटातील ‘जी रहे थे हम’ या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. त्यामुळे सध्या हाा टीझर सोशल मिडीयावर ट्रेन्ड […]

Salman Khan

Salman Khan

मुंबई : सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ साठी मेहनत घेत आहे. हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. दरम्यान सलमान खान आपल्या चाहत्यांसाठी चित्रपटातील अपडेट्स शेअर करत असतो. आता त्याने या चित्रपटातील ‘जी रहे थे हम’ या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. त्यामुळे सध्या हाा टीझर सोशल मिडीयावर ट्रेन्ड करत आहे.

या गाण्याचं विशेष म्हणजे हे गाणं सलमान खानने स्वतः गायलं आहे. हे पुर्ण गाणं उद्या 21 मार्च ला प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील ‘जी रहे थे हम’ या गाण्यात सलमान खानसह पूजा हेगडे ही दिसत आहे. गाण्यातील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी चांगलीच भावली आहे. विशेष म्हणजे यातील सलमानच्या लूकने लक्ष वेधले आहे.

यातील सलमानचा लूक म्हणजे त्याने सलमान ब्लू जीन्स आणि ग्रे शर्ट घातलेली दिसत आहे. मोठे केस या केसांना त्याने कलर केलं आहे. डोक्याला निळा स्कार्फ बांढला आहे. त्याचा चालण्याचा स्वॅग पाहता त्याचं वय अर्ध्याहून कमी वाटत आहे.

बिश्नोईची पुन्हा धमकी; भाईजान सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा खडा पहारा

‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. त्यामुळे ईद निमित्त चाहत्यांना सलमान खानचे हे गिफ्ट असणार आहे. 21 एप्रिल्ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केलं आहे. साजिद नाडियाडवालाने हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे.

Exit mobile version