Download App

‘एका माकडाने काढले दुकान’ गाण्यावर किंग खानच्या लेकीचा डान्स, व्हिडीओ पाहून सलील कुलकर्णी म्हणाले…

Saleel Kulkarni Post: झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ (The Archies) नुकताच रिलीज झाला आहे. सुहाना खान (Suhana Khan), खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा या स्टारकिड्सने सिनेमातून पदार्पण केलं आहे. शाहरुखची लेक सुहानाने पदार्पणातच लिपलॉक सीन देत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवाय श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांचाही सिनेमात लिपलॉक सीन आहे.

सध्या या स्टारकिड्सच्या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. या सिनेमातील ‘वुली बुली’ गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सुहाना खान आणि खुशी कपूर डान्स करताना बघायला मिळत असून “एका माकडाने काढले दुकान” हे गाणं एडिट करून त्यावर लावण्यात आला आहे. ‘द आर्चीज’ आणि ‘एका माकडाने काढले दुकान’चा हा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यावर लोकप्रिय मराठी गायक सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) यांनी देखील हा व्हिडिओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे.


” एका माकडाने काढले दुकान..आली गिऱ्हाईके छान छान ” विंदांच्या या कवितेचं मी १९९९ मध्ये गाणं केलं होतं… आत्ताची धृपद गायिका मेघना सरदार तेव्हा १०-११ वर्षांची होती, तिने ते गायलं होतं …. लहान मुलांच्या अनेक पिढ्यांनी हे मनापासून ऐकलं…. दाद दिली… नंतर अनेक YouTube channel ने ह्याचे उथळ हिंदी भाषांतर करून माझ्याच चालीत रिलीज केलं…. मी अर्थातच ” निषेध सुद्धा नोंदवलेला नाही” मग हळूहळू मराठीतल्या पण अनेक YouTube चॅनल ने विंदा किंवा माझा उल्लेख न करता ते वाजवले , त्याचा व्हिडिओ केला. मी पुन्हा एकदा “जगभरातील मुलांनी ऐकलं …त्यांना आवडलं हे खूप आहे ” असं समजूतदार ( खरं तर बावळट आणि आळशी ) धोरण स्वीकारलं…

आता काही दिवसांपूर्वी हे गाणं ह्या धमाल editing सकट बघायला मिळालं ..ते सुद्धा viral झालं..आता तर मी निषेध वगैरे ओलांडून..हसण्याच्या स्टेज ला आलो आहे…. विंदांच्या घरी बसून मी त्यांना हे गाणं ऐकवलं होतं…त्यांनी हा व्हिडिओ पाहिला असता तर ” माझ्या मना बन दगड * नावाची त्यांची कविता ऐकावयाला त्यांना अजून एक कारण सापडले असते…🤣🤣🤣 तर.. ” एका माकडाने काढले दुकान ” या गाण्याचा प्रवास गमतीशीर चालू आहे…. आजची छोटी मुलं सुद्धा ते गाणं ऐकातायत… विंदा….आपल गाणं HIT आहे…

Devara Teaser: अखेर प्रतीक्षा संपली..! ज्युनिअर एनटीआरच्या ‘देवरा’ची पहिली झलक आली समोर

“एका माकडाने काढले दुकान” ही कविता विंदा करंदीकर यांनी लिहिली आहे. तर याचं गाण्याचे नंतर सलील कुलकर्णीं यांनी गाणं केलं होतं. सलील कुलकर्णींच्या या गाण्याच्या भन्नाट पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंटही केल्या आहेत.

follow us