Download App

Shahrukh and Salman : मला आणि सलमानला एकत्र काम करायचं होतं पण…

मुंबई : यशराज फिल्म्सचा पठाण हा चित्रपट आता ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ठरला आहे. हा चित्रपट सर्वांत जास्त कमाई करणारा हींदी चित्रपट ठरला आहे. या स्पाय युनिव्हर्स चित्रपटामध्ये शाहरूख आणि सलमानने अनुक्रमे पठाण आणि टायगरची भूमिका साकारल्या आहेत. या भूमिका प्रेक्षकांनी प्रचंड आवडल्या असून त्यांनी त्या अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत.

त्यानंतर आता अभिनेते शाहरूख आणि सलमान खान या दोघांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांनंतर एकत्र आल्यानंतर त्यांनी या चित्रपटात कसे थ्रिल केले. अदित्य चोप्रा यांनी त्यांना संकल्पना समजावून सांगितली. सिद्धार्थ आनंद यांनी कसे दिग्दर्शन केले. याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Shahrukh and Salman

सलमान खान म्हणाला, ‘ मला आणि शाहरूख खानला एकत्र येण्यासाठी एका खास चित्रपटाची गरज होती. आम्हाला एकत्र येण्यासाठी पठाण हा खास चित्रपट ठरला. जेव्हा आम्ही करन अर्जून केला. तो एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता आणि आता पठाण देखील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. प्रेक्षकांनी आमच्यावर प्रेम केले. आदीने जेव्हा मला सीन्स समजावून सांगितले तेव्हा मी भारावून गेलो.’

‘प्रेक्षकांना आमच्याकडून काय आपेक्षा आहेत ? हे त्यांनी हेरलं. आम्हाला अत्यंत जवळून त्यांनी पाहिल होतं. आणि पठाणच्या यशानंतर ते सत्यात आलं आहे. तर आम्ही कोरोनानंतर प्रेक्षकांना चित्रपटागृहात खेचून आणण्यात यशस्वी झालो आहोत.’

यावेळी शाहरूख खान म्हणाला, ‘मला आणि सलमानला नेहमीच एकत्र काम करायचं होत. पण आम्ही योग्य चित्रपटाची वाट पाहत होतो. कारण आम्हाला माहितीय आम्हाला एकत्र पाहताना प्रेक्षकांच्या आपेक्षा काय आहेत ? जर त्या आपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर ते निराश होतील. त्यामुळे जेव्हा आदीने मला पठाणमध्ये मी आणि सलमान एकत्र असणार आहोत असं सांगितलं तेव्हा त्यात काही अॅक्शन सीन तयार करण्यात आले. कारण प्रेक्षकांना आमच्याकडून तेच हवं आहे.’

Tags

follow us