Salman Khan : भाईजानला लग्नाची मागणी घालणारी ‘ती’ तरुणी कोण? जाणून घ्या…

Alena Khalifeh Video Viral : बॉलिवूड अभिनेता सलमान खान म्हणजेच सर्वांचा लाडका भाईजानचा (Salman Khan) मोठा चाहतावर्ग आहे. भाईजान एक लोकप्रिय अभिनेता असला तरी आज तो बॅचलर आहे. भाईजान लग्न कधी होणार असा सवाल अनेकांना पडला आहे. दरम्यान भाईजानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एलीना खलफीह (Alena Khalifeh) भाईजानला लग्नाची […]

Salman Khan Salman Khan च्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी तीन जण ताब्यात; तपास क्राईम ब्रॅंच करणार

Salman Khan

Alena Khalifeh Video Viral : बॉलिवूड अभिनेता सलमान खान म्हणजेच सर्वांचा लाडका भाईजानचा (Salman Khan) मोठा चाहतावर्ग आहे. भाईजान एक लोकप्रिय अभिनेता असला तरी आज तो बॅचलर आहे. भाईजान लग्न कधी होणार असा सवाल अनेकांना पडला आहे. दरम्यान भाईजानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एलीना खलफीह (Alena Khalifeh) भाईजानला लग्नाची मागणी घालत असल्याचे दिसून आला आहे.


एलीना खलफीह भाईजानला प्रपोज करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एलीना भाईजानला विचारत आहे,”मी हॉलिवूडवरुन खास तुझ्यासोबत बोलायला आली असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. पाहताक्षणी मी तुझ्या प्रेमात पडले आहे. यावर उत्तर देत भाईजान म्हणाला की,”तू शाहरुख खान म्हणजेच किंग खानबद्दल बोलत आहेस ना? यावर एलीना म्हणते,”नाही.. मी तुझ्याबद्दल बोलत आहे.

तू माझ्याबरोबर लग्न करशील का? त्यावर हसत भाईजान म्हणतो की,”आता लग्नाचे दिवस निघून गेले आहेत”. भाईजानने नकार दिल्यावर एलीनाने त्याला लग्नाला नकार देण्याचे कारण विचारत त्याला सवाल केले आहेत. त्यावर भाईजान म्हणाला,”तू मला 20 वर्षांअगोदर भेटायला हवी होतीस”. भाईजानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ ‘आयफा 2023’ (IIFA 2023) दरम्यानचा असल्याचे सांगितले जात आहे.


एलीना खलफीह नेमकी कोण ?

भाईजानला लग्नाची मागणी घालणारी एलीना खलफीह (Alena Khalifeh) सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह आहे. दिसायला सुंदर असलेली एलीना सतत बोल्ड लुकमध्ये दिसून येत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग देखील आहे. इन्टाग्रामवर तिला 90.5k लोक फॉलो करतात. एके चॅट्स नावाचा तिचा शो जोरदार सुरु आहे.

राघव-परिणीती ‘या’ ठिकाणी अडकणार विवाह बंधनात; जोडपे वेंडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी निघाले

भाईजानचा (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाने भारतात फक्त 101 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्याचा ‘टायगर 3’ हा सिनेमा आता चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज होत आहे. तसेच ‘बजरंगी भाईजान 2’देखील लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. भाईजानच्या आगामी प्रोजोक्टची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे.

Exit mobile version