Download App

Tiger 3 Song: अरिजित सिंहचा जादुई आवाजात ‘टायगर-3 मधील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Tiger 3 Ruaan Song: अभिनेता भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या टायगर- 3 (Tiger 3) या सिनेमामधील रुआं (Ruaan) हे पहिलं गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचा लिरिकल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये भाईजान आणि कतरिना यांचा रोमँटिक अंदाज डान्स करत असल्याचे बघायला मिळत आहे. टायगर-3 सिनेमातील ‘लेके प्रभू का नाम’ हे गाणं गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं. या गाण्याला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती. त्यानंतर आता रुआं गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे.


टायगर- 3 सिनेमातील ‘रुआं या गाण्यात जोया आणि टायगरचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. रुआं हे गाणे अरिजित सिंहनं गायले असून या गाण्याला चाहत्यांनी खूप प्रेम दिलं आहे. इर्शाद कामिल हे रुआं या गाण्याचे संगीतकार आहेत. दिल दियां गल्लां या टायगर जिंदा है या चित्रपटामधील गाण्याला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती. आता टायगर- 3 सिनेमातील रुआं या गाण्याचे चाहते तोंडभरून कौतुक करत आहेत.

टायगर चित्रपटाला चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चित्रपटाच्या तिसरा भाग दिवाळीच्या मुहूर्तावर 12 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान टायगर तर इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून 12 नोव्हेंबरला सकाळी ७ वाजल्यापासून देशभरात चित्रपटाचे शो सुरू होणार असल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे.

Kamal Haasan : कमल हासनने वाढदिवशी चाहत्यांना दिलं सरप्राईज; ‘Thug Life’चा टीझर प्रदर्शित

टायगर 3 चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केलं आहे. येत्या 12 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजताच चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. पहिल्या शोसाठी अॅडव्हान्स बुकींची तारीखही ठरली आहे. 5 नोव्हेंबरपासून चित्रपटाच्या तिकीटाची बुकींग सुरु होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

कधी रिलीज होणार ‘टायगर 3’?
‘टायगर 3’ या सिनेमात इमरान हाश्मी, सलमान खान आणि कतरिना कैफ हे कलाकार मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत. हा सिनेमा यंदा दिवाळीला 12 नोव्हेंबर दिवशी थिएटरमध्ये येणार आहे.

Tags

follow us