Kamal Haasan : कमल हासनने वाढदिवशी चाहत्यांना दिलं सरप्राईज; ‘Thug Life’चा टीझर प्रदर्शित
Thug Life Teaser Released : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवशी त्यांनी चाहत्यांना खास गिफ्ट दिले आहे. कमल हासनच्या ‘ठग लाईफ’ (Thug Life) या सिनेमाचा हटके टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Teaser Released) ‘नायकन’ या सिनेमानंतर तब्बल 36 वर्षांनी ‘ठग लाईफ’ (Thug Life Movie ) या सिनेमाच्या माध्यमातून कमल हासन पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर काम करत आहेत. यामुळे या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.
कमल हासन यांनी आपल्या वाढदिवशी चाहत्यांना खास गिफ्ट दिले आहे. अभिनेत्याने आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. कमल हासनच्या आगामी सिनेमाचं नाव ‘ठग लाईफ’ असे आहे. या सिनेमाच्या माध्यमातून कमल हासन आणि मणिरत्नम 36 वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. याअगोदर 1987 मध्ये आलेल्या ‘नायकन’ या सिनेमात त्यांनी एकत्र काम केल्याचे बघायला मिळाले होते. कमल हासन यांनी ‘ठग लाईफ’ या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल्याचे दिसत आहे. राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल आण मद्रास टॉकिज या सिनेमाची निर्मिती करत आहेत. या सिनेमामध्ये कमल हासनसह जयम रवी, तृषा, दुलकर सलमान, अभिरामी आणि नासिर हे कलाकार मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत.
‘ठग लाईफ’ या सिनेमाचं नाव आधी ‘KH 234’ असे ठेवण्यात आले होते. परंतु नंतर या सिनेमाचं नाव बदलण्यात आल्याचे बघायला मिळाले आहे. टीझरच्या सुरुवातीला मणिरत्नम आणि ए आर रहमान यांचं नाव झळकत आहे. त्यानंतर एका ग्राऊंडला कमल हासन उभे असल्याचे बघायला मिळाले आहे. हातावर पट्टी, लांबलचक केस, भेधडक नजर असा काहीसा लूक कमल हासन यांचा बघायला मिळत आहे. यानंतर कमल हासनच्या अॅक्शनचा तडका चाहत्यांना बघायला मिळत आहे.
Salman Society Trailer: गौरव अन् वनिता खरातच्या ‘सलमान सोसायटी’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
कमल हासनच्या ‘ठग लाईफ’ या सिनेमाची चाहत्यांना खूप उत्सुकता लागली आहे. मणिरत्नम यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर टीझर आणि पोस्टर प्रदर्शित झाल्याने चाहत्यांची या सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. गँगस्टार अॅक्शन पॅक्ड ड्रामा बघायला चाहत्यांना देखील आवडत असेल तर हा सिनेमा नक्की पाहा. मणिरत्नम आणि कमल हासन दोघांकडून चाहत्यांच्या खूप अपेक्षा आहेत. हा पॅन इंडिया सिनेमा असून हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये हा सिनेमा लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे.