Salman Society Trailer: गौरव अन् वनिता खरातच्या ‘सलमान सोसायटी’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Salman Society Trailer: गौरव अन् वनिता खरातच्या ‘सलमान सोसायटी’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Salman Society Trailer Release: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे. या कार्यक्रमातील कलाकार महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. आता या कार्यक्रमातील वनिता खरात (Vanita Kharat) आणि गौरव मोरे (Gaurav More) हे ‘सलमान सोसायटी’ (Salman Society) या मराठी सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (Marathi Movie) या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला (Social media) असून सध्या तो जोरदार चर्चेत आला आहे.

‘सलमान सोसायटी’ या नावावरुन सिनेमात नेमकं काय बघायला मिळणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता सिनेमाचा ट्रेलर पाहून चाहत्यांनी थोडा अंदाज लावला आहे की नेमकं सिनेमाची कथा काय असणार आहे. सिनेमाच्या 2 मिनिटे 53 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये इमोशन, ड्रामा आणि कॉमेडीची मेजवानी बघायला मिळाली आहे. समाजातील अनाथ मुले आणि शिक्षणापासून वंचित मुलांवर भाष्य करणारा हा सिनेमा असल्याचे ट्रेलरवरुन स्पष्ट झाले आहे. तसेच अनाथ लहान मुलांची शिक्षणासाठीची धडपड अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. एकंदरीत भावनिक परंतु कॉमेडी असा हा ट्रेलर सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चेत आला आहे.

‘सलमान सोसायटी’ (Salman Society Movie) हा मराठी सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील एक सॉन्ग सध्या प्रदर्शित करण्यात आले असून ‘पार्टी दणाणली…’ असे या गाण्याचे बोल असून यामध्ये पुष्कर लोणारकर, गौरव मोरे (Gaurav More), शुभम मोरे आणि विनायक पोतदार यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आला आहे.

Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाच्या ‘त्या’ व्हिडिओवर थेट ‘बिग बीं यांना सुद्धा राग अनावर!

‘सलमान सोसायटी’या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन कैलाश पवार यांनी केलं आहे. ‘सलमान सोसायटी’ हा सिनेमा शिक्षणावर आधारित भाष्य करणारा आहे. भारत देश साक्षर होईल तेव्हा देशाचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे. ‘पार्टी दणाणली’ हे गाणे श्रेयस आंगणेने संगीतबद्ध केले आहे आणि नागेश मोरवेकरने गायले आहे.

‘सलमान सोसायटी’ या मराठी सिनेमात आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित करणारा गौरव मोरे एका अनोख्या परंतु महत्त्वपूर्ण भूमिकेत मनोरंजन करताना दिसणार आहे. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी या सिनेमात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube