Download App

Salman Khan धमकीप्रकरणी मोठी अपडेट; मेल प्रकरणी एका विद्यार्थ्याविरुद्ध लुकआउट नोटीस

Salman Khan Death Threat: अभिनेता सलमान खान (Salman Khan) म्हणजेच भाईजानला धमकी प्रकरणी वांद्रे पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध एलओसी जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ब्रिटनमध्ये शिकत असलेल्या हरियाणातील तृतीय वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्याविरुद्ध लुकआउट सर्कुलर जारी केले आहे.

ज्याने भाईजानला धमकीचा ईमेल पाठवला आहे. मार्च महिन्यामध्ये भाईजानच्या जवळच्या व्यक्तीला गोल्डीच्या नावाने धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. त्यानुसार भाईजानच्या जवळच्या मित्राने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी प्राथमिक तांत्रिक तपशील तपासल्यावर हा ई-मेल यूकेहून पाठवल्याचे आढळून आली असल्याची माहिती मिळाली होती.

हरियाणातील वैद्यकीय विद्यार्थ्याने मेल पाठवल्याचे पोलिसांना समजल्यावर त्यांनी या प्रकरणी लुक आऊट परिपत्रक काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाईजानला पत्राद्वारे तसेच ईमेलद्वारे धमकी दिली जात आहे. भाईजान हा एका पत्रकार परिषदेला हजेरी लावला होता. या पत्रकार परिषदेमध्ये त्याला मिळणाऱ्या धमकीबद्दल विचारण्यात आले होते.

तुम्ही सगळ्या देशाचे भाईजान आहात, मग आता मिळणाऱ्या धमकीकडे कसे बघता, असा सवाल यावेलोई त्याला करण्यात आला होता. त्यावर भाईजान उत्तर देत सांगितले आहे की, मी सगळ्यांचा भाई नाही, काहींचा ‘भाई’ आहे..तर कोणाचा तरी ‘जान’ आहे. असे उत्तर देत भाईजानने धमकीवर थेट उत्तर देणे टाळले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी भाईजानला धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता.

‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

ज्यामध्ये ‘गोल्डी भाई (गोल्डी ब्रार) यांना भाईजानशी बोलायचे आहे. लॉरेन्स बिश्नोई यांची मुलाखत तुम्ही पाहिलीच असेल. पाहिली नसेल तर पाहायला सांगा. प्रकरण बंद करायचं असेल तर हे प्रकरण मिटवा. समोरासमोर बोलायचे असेल तर सांगा. आता वेळीच कळवले आहे, पुढच्या वेळी फक्त झटकाच बसणार आहे, अशी धमकी देणारा ई-मेल पाठवण्यात आला होता.

भाईजानने एका दिलेल्या मुलाखतीच्या दरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने भाईजानला उघडपणे धमकी दिली आहे. आमच्या भागात भाईजानने काळवीट मारल्याचे लॉरेन्सने म्हटले होते. त्याला आमच्या बिकानेरच्या मंदिरात जाऊन माफी मागावी लागणार आहे. जर त्याने माफी मागितली नाही तर मी त्याला योग्य उत्तर देणार आहे. भाईजानचे ‘किक 2’, ‘टायगर 3’ हे सिनेमे लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.

Tags

follow us