Salman Khan ex girlfriend Somy Ali Message To Lawrence Bishnoi : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड (Salman Khan ex girlfriend) सोमी अलीने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो शेअर करत एक लांबलचक पोस्ट शेअर केलीय. सलमान खानसोबतच्या नात्याबद्दल अनेकवेळा उघडपणे बोलणाऱ्या सोमी अलीने (Somy Ali) अलीकडेच एका पोस्टने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवून दिलीय. सलमान खानचा शत्रू म्हणून सध्या चर्चेत असलेल्या व्यक्तीच्या नावाने तिने ही पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट तिने लॉरेन्स बिश्नोईच्या ( Lawrence Bishnoi) नावाने लिहिलेली आहे.
पोस्टमध्ये काय म्हटलंय?
सोमी अलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, हा लॉरेन्स बिश्नोई यांना थेट संदेश आहे. नमस्ते! लॉरेन्स भाई, तुम्ही तुरुंगातून देखील झूम कॉल करत आहात, असं मी ऐकले आणि पाहिलंय. म्हणून मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. हे कसं शक्य होईल, हे कृपया मला तुम्ही सांगा. संपूर्ण जगात माझं सर्वात आवडतं ठिकाण राजस्थान आहे. आम्हाला तुमच्या मंदिरात पूजेसाठी यायचं आहे. पण आधी तुम्ही झूम कॉल करा. पूजेनंतर थोडी चर्चा देखील करू या. विश्वास ठेवा हे तुमच्यासाठी फायदेशीर आहेत. जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर दिला तर फार मोठे उपकार होतील, धन्यवाद!
Salman Khan : सलमान खान गोळीबार प्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, ‘बिश्नोई टोळीशी…’
सलमान खान बिश्नोई गॅंगच्या रडारवर असल्याचं वृत्त सध्या समोर येतंय. सोमीने आज सकाळी ही पोस्ट शेअर केलीय. यामध्ये तिने लॉरेन्स बिश्नोईला डायरेक्ट मेसेज केलाय. सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडची ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. आता सलमान खानच्या गर्लफ्रेंडने केलेली पोस्ट कोणतं नवीन वादळ घेवून येणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसंच लॉरेन्स बिश्नोई सोमी अलीला भेटणार का? याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं काही.
Salman Khan: सलमानला मारण्यासाठी 6 शूटर अन् 20 लाखांची सुपारी, पोलिसांच्या आरोपपत्रात खुलासा
काही दिवसांपूर्वी बिश्नोई गॅंगने सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केला होता. त्यानंतर आता सलमान खानच्या जवळचे मानले जाणारे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची कबूली बिश्नोई गॅंगने दिलीय. या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या साबरमती तुरुंगात बंद आहेत. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करी असे अनेक गुन्हे पंजाब, दिल्ली, गुजरात आणि मुंबईमध्ये पोलिसांनी नोंदवले आहेत.