बिश्नोई समाज ज्याची पूजा करतो, ते तुम्ही खाल्लं; सलमानला ‘या’ नेत्याने केली माफी मागण्याची विनंती

  • Written By: Published:
बिश्नोई समाज ज्याची पूजा करतो, ते तुम्ही खाल्लं; सलमानला ‘या’ नेत्याने केली माफी मागण्याची विनंती

BJP leader Harnath Singh Yadav on Salman Khan : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचं नाव समोर येत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागावी, असा सल्ला दिला आहे. (Baba Siddiqui) विशेष म्हणजे लॉरेन्स गँग सलमानलाही धमक्या देत आहे. काही महिन्यांपूर्वी सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात टोळीतील काही जणांना अटकही करण्यात आली होती.

भाजप नेते हरनाथ सिंह यादव यांनी लिहिलं आहे की, “‘प्रिय सलमान खान, ज्या काळ्या हरणाची बिश्नोई समाज देवता म्हणून पूजा करतो, तुम्ही त्याची शिकार केली आणि ते शिजवून खाल्लं. त्यामुळे बिष्णोई समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, बिष्णोई समाजात दीर्घकाळापासून याबद्दल नाराजी आहे. माणूस चुका करतो. तुम्ही मोठे अभिनेते आहात, देशातील असंख्य लोक तुमच्यावर प्रेम करतात. माझा तुम्हाला सल्ला आहे की, तुम्ही बिश्नोई समाजाच्या भावनांचा आदर करा आणि तुमच्या चुकीबद्दल बिष्णोई समाजाची माफी मागावी.”

हरनाथ सिंह यादव हे भाजपचे माजी राज्यसभा खासदार आहेत. ते उत्तर प्रदेशातील मैनपुरीचे आहेत. नंतर ते एटा येथे स्थायिक झाले. हरनाथ सिंह यादव हे 1996 ते 2008 पर्यंत उत्तर प्रदेशचे आमदार होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचारक म्हणून राजकीय कारकीर्द सुरू करणारे हरनाथ सिंह यादव हे भाजपचे प्रदेश सरचिटणीसही होते. ते कल्याण सिंह यांच्या जवळचे मानले जायचे.

सलमान-दाऊद गँगची मदत करणाऱ्यांनो; बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गँगची फेसबुक पोस्ट

1998 मध्ये जोधपूरमध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खान त्याच्या सहकलाकारांसह शिकारीला गेला होता. 27-28 सप्टेंबर 1998 च्या रात्री घोडा फार्म हाऊसमध्ये काळवीटाची शिकार करण्यात आली. याचा ठपका सलमान खानवर पडला. यानंतर 1 ऑक्टोबर 1998 च्या रात्री जोधपूरच्या कांकणी गावात पहाटे 2 वाजता गोळीबाराचा आवाज आला. गावकरी घटनास्थळी पोहोचले असता त्यांना दोन काळवीटांची शिकार झाल्याचं दिसलं. तेथून एक जिप्सी पळताना ग्रामस्थांना दिसली.

या प्रकरणी 12 ऑक्टोबर 1998 रोजी सलमान खानला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. पाच दिवस तुरुंगात राहिल्यानंतर 17 ऑक्टोबर 1998 रोजी सलमान खानची जोधपूर तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. 5 एप्रिल 2018 रोजी, अभिनेता सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आणि त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 7 एप्रिल 2018 रोजी सलमान खानला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आणि त्याच दिवशी त्याची सुटका झाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube