Salman Khan firing case accused attempted Suicided : अभिनेता सलमान खानच्या ( Salman Khan ) घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींपैकी ( accused ) एका आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न ( attempted Suicided ) केला आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Prajakta Mali : प्राजक्ताने शेअर केले काळ्या ब्लेझर सूटमधील हटके फोटो
अनुज स्थापन असं या 32 वर्षीय आरोपीचं नाव आहे. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी त्याच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. तर मुंबई पोलिसांच्या ताब्यामध्ये असताना या आरोपीने चादरीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता त्याला जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
Salman Khan residence firing case | Accused Anuj Thapan who attempted suicide in custody has been declared dead by doctors at the hospital: Mumbai Police https://t.co/3OMrikn0nP
— ANI (@ANI) May 1, 2024
प्रत्येक नाशिककरांना गोडसेंचा परिचय; उमेदवारी जाहीर होताच भुजबळांनी सांगितलं पुढचं प्लॅनिंग
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार
14 एप्रिलला पहाटे दोन दुचाकीस्वारांनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. या घटनेनंतर अभिनेत्याचे कुटुंब, बॉलीवूड इंडस्ट्री आणि चाहते त्याच्या सुरक्षेबाबत चिंतित झाले होते. नंतर एका मेलद्वारे लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या घटनेची जबाबदारी घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. त्यानंतर दोन दिवसांनी मुंबई पोलिसांनी दोन्ही दुचाकीस्वारांना गुजरातमधील कच्छमधून अटक केली.
तसेच आता त्यांना 25 एप्रिल 2024 पर्यंत 10 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली होती. या प्रकरणात आणखीही काही संशयितांना आधीच ताब्यात घेतले गेले होते. मात्र, या गोळीबाराचं प्लॅनिंग काही एका दिवसात झालेलं नाही. यासाठीही मोठी तयारी करण्यात आली होती, याचा खुलासा आता झाला आहे.
सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी आणि पनवेलच्या फार्म हाऊसची शूटरने एका महिन्यापूर्वीच रेकी केली होती, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी काल तिघा संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी सुरू असून अद्याप सविस्तर माहिती हाती आलेली नाही. मात्र या गोळीबारात वापरण्यात आलेली दुचाकी आणि पनवेलमध्ये ज्या ठिकाणी हे लोक राहत होते त्या फ्लॅटमालकाचा मागमूस पोलिसांना मिळाला आहे.