Salman Khan House Firing Case: सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. (Salman Khan House Firing) पोलिसांनी (Police) सागर पाल आणि विक्की गुप्ता यांना न्यायालयात (Court) हजर करून चार दिवसांची कोठडी मागितली. दोन्ही आरोपींना 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
या घटनेनंतर केल्यानंतर दोन्ही आरोपींनी तीन वेळा कपडे बदलल्याचे गुन्हे शाखेने न्यायालयाला सांगितले. त्याची ओळख पटू नये म्हणून त्या दोघांनी सतत कपडे बदलण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी न्यायालयाला पुढे सांगितले की, दोन्ही आरोपींकडे एकूण 40 गोळ्या होत्या, त्यापैकी 5 गोळ्या घरावर झाडाले आहेत तर 17 जप्त करण्यात आले असून उर्वरित 18 गोळ्यांचा शोध सुरू आहे. सरकारी वकील म्हणाले, त्यांना आर्थिक मदत कोण करत आहे? याचीही चौकशी व्हायला हवी.
सलमानशी शत्रुत्व नव्हते
हे दोन्ही आरोपी बिहारचे रहिवासी असल्याचे सरकारी वकिलाने न्यायालयात सांगितले. अशा स्थितीत या दोघांना आर्थिक मदत कोण करत होते? हे शोधून काढावे लागणार आहे. दोघांचेही सलमान खानशी वैर नव्हते, मात्र त्यांनी त्याच्या घरावर गोळीबार का केला? त्यांना आदेश कोण आणि कसे देत होते याचा शोध घ्यावा लागणार आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा यांच्या संपर्कात कोण आणि कसे? संपर्कात असलेल्यांची पार्श्वभूमी जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.
आरोपीकडे दोन मोबाईल होते. एक मोबाईल पोलिसांना सापडला असून दुसरा मोबाईलचा शोध सुरु आहे. आरोपी मोबाईल वापरून तिसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात होते. हे लोक काही वायफाय वापरून इंटरनेट वापरत होते. याचीही चौकशी व्हायला हवी. आरोपींच्या वकिलाने न्यायालयात सांगितले आहे की, आरोपी तपासात सहकार्य करत आहेत. त्याने पोलिसांना जे काही माहित होते ते सांगितले आहे. या कारणास्तव त्याची रवानगी कारागृह कोठडीत करण्यात यावी.
King Movie: शाहरुख खानचा मोठा निर्णय; ‘या’ दिवशी सुरू होणार ‘किंग’ सिनेमाचं शूटिंग
अनमोल बिश्नोई विरुद्ध LOC जारी करण्यासाठी अर्ज
या प्रकरणी मुंबई क्राइम ब्रँचने केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई विरोधात एलओसी जारी करण्यासाठी अर्ज केला होता. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर काही तासांनी अनमोल बिश्नोईने फेसबुकवर त्याच्या नावाने तयार केलेल्या प्रोफाईलद्वारे याची जबाबदारी स्वीकारली.