Download App

‘Yentamma’ गाण्यावर थिरकला सल्लू भाई; पाहा गोल्डन भाईजानचा धुमाकूळ घालणारा व्हिडिओ

Yentamma Song Out: बॉलिवूडचा भाईजानचा (Salman Khan) आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा सिनेमागृहामध्ये मोठा धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज होणार आहे. आता या सिनेमात ‘येंतम्मा’ (Yentamma Song) हे गाणं चाहत्यांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात भाईजानचा दाक्षिणात्य लुक चाहत्यांच्या पसंतीला उतरला आहे.


‘येंतम्मा’ या गाण्यावर भाईजान आणि वेंकटेश दग्गुबाती, राम चरणसह, पूजा हेगडे, शहनाज गिल, राघव गुयाल, जस्सी गील आणि पलक तिवारीची मोठी झलक बघायला मिळाली आहे. या गाण्यामध्ये भाईजानने लुंगी घातली असून तो गॉगल लाऊन डान्स करताना दिसत आहे. भाईजान आणि राम चरण, वेंकटेशचा हटके स्वॅग चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

‘येंतम्मा’ हे गाणं सोशल मीडियावर रिलीज होताच, या गाण्याला हजारपेक्षा जास्त व्ह्युज मिळत आहेत. या गाण्यात राम चरणची धमाकेदार एन्ट्री चात्यांच्या पसंतीला उतरली आहे. तर दुसरीकडे सलमानच्या लुंगी अवताराचं चाहत्यांकडून कौतुक केलं जात आहे.

ऋतुराजची छकडी, ५ लाखांचे बक्षीस, अन् सायलीचा पिवळा ड्रेस

‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमात ‘नय्यो लगदा’,’बिल्ली बिल्ली’ आणि ‘जी रहे थे हम’, ‘बथुकम्मा’ ही गाणी चाहत्यांच्या भेटीला आली आहे. आता या सिनेमात ‘येंतम्मा’ हे पाचवं गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याने चाहत्यांना वेड लागले आहे. चाहत्यांमध्ये या गाण्याची चांगलीच क्रेझ वाढत आहे. भाईजानने सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

Tags

follow us