ऋतुराजची छकडी, ५ लाखांचे बक्षीस, अन् सायलीचा पिवळा ड्रेस

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 04T160107.628

Sayali Sanjeev ruturaj Gaikwad : देशभरात सध्या आयपीएलचा फिव्हर बघायला मिळत आहे. अशातच सध्या क्रिकेट विश्वात आता अभिनेत्री सायली संजीवची चर्चा जोरदार सुरु आहे. धडाकेबाज ऋतुराज गायकवाडचं नावं आलं की सर्वांच्या डोळ्यासमोर सायली संजीव आल्याशिवाय राहत नाही. आताही तेच झालं. इकडे ऋतुराजने काल षटकार मारत सर्वांचे लक्ष वेधले, तर आज सायलीने पिवळ्या रंगाचा कुडता घातल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official)


चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल 2023च्या लढतीत चेन्नई सलामीवीरांनी मोठा धमाका केला. दरम्यान चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर उभी असलेल्या टाटा टियागो कारवर ऋतुराज गायकवाडने षटकार मारला. यानंतर ऋतुराजवर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. यामुळे सायलीने नुकतंच नवं फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.


सायली नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. परंतु, यावेळी तिने पिवळ्या रंगाच्या कुडत्याचा लुक शेअर केला आहे. तिने घातलेल्या पिवळ्या रंगाच्या ड्रेसमुळे चाहत्यांनी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. या फोटोवरून चाहत्यांनी तिला मजेशीर कॉमेंट्स करत काही सवाल केले आहेत.

वहिनी काल मॅच जिंकलो म्हणून yellow dress का? असा सवाल केला जात आहे. Oo ho are you csk fan and rutu raj , Rutu ka Raj, Sayali ruturaj Gaikwad vahini saheb अशा अनेक मजेशीर कमेंट्स तिच्या फोटोवर केले जात आहेत. गायकवाडने चौथ्या षटकात फिरकी गोलंदाज अष्टपैलू कृष्णप्पा गौतमच्या लास्टच्या चेंडूवर षटकार ठोकला होता.

तो थेट टाटा कारला लागला आणि तो तिथे डेंट झाला. यामुळे टाटा टियागो ईव्ही चेंडू मारल्यावर ५ लाख रुपये देण्याचा मंजूर केले. जेव्हा जेव्हा चेंडू डायरेक्ट टाटा टियागो ईव्हीवर लागला, तेव्हा ५ लाख रुपये दिले जातात. या पैशांचा उपयोग कर्नाटक मधील कॉफीच्या शेतातील जैवविविधता वाढवण्याकरिता रोपे लावून केला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ऋतुराज आणि सायलीच्या लव्ह अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

भाईजानच्या ‘त्या’ फोटोवर चाहते फिदा; एक्स गर्लफ्रेंडनेही केली कमेंट, लग्न करा..

सायलीच्या प्रत्येक फोटोवर ऋतुराजच्या नावने चाहते तिला डिवचतात. ऋतुराजने सायलीच्या वनपीस घातलेल्या फोटोवर कमेंट केली होती. या कमेंटमुळे या चर्चा जोरदार सुरु झाल्या होत्या. ऋतुराजने तिच्या एका फोटोवर वाह… अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केले होते. यावर सायलीनेही हार्ट इमोजी शेअर करत त्याला रिप्लाय दिला होता. त्यानंतर त्यांच्या अफेरच्या चर्चांना उधाण आले होते.

Tags

follow us